भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एका शिखरावर झेप घेतली. एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय म्हणजे या दोन्ही फॉरमॅटचा समावेश असलेल्या 'लिमिटेड ओव्हर' क्रिकेटमध्ये कोहली आता सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर यांचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातील आपल्या नाबाद ७४ धावांच्या खेळीदरम्यान विराटने लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये १८,४३७ धावा पूर्ण केल्या. तर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या नावावर १८,४३६ धावांची नोंद आहे. या यादीत तिसऱ्या स्थानावर कुमार संगकारा, चौथ्या स्थानावर रोहित शर्मा, पाचव्या स्थानावर महिला जयवर्धने आणि सहाव्या स्थानावर रिकी पॉन्टिंग आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा (एकदिवसीय + टी२०)
| क्रमांक | खेळाडू | धावा |
| १ | विराट कोहली | १८ हजार ४३७* |
| २ | सचिन तेंडुलकर | १८ हजार ४३६ |
| ३ | कुमार संगकारा | १५ हजार ६१६ |
| ४ | रोहित शर्मा | १५ हजार ५८९* |
| ५ | महेला जयवर्धने | १४ हजार १४३ |
| ६ | रिकी पॉन्टिंग | १४ हजार १०५ |
कोहलीने यापूर्वीच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कुमार संगकाराला मागे टाकून दुसरे स्थान पटकावले. आता लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरला मागे टाकून अव्वल स्थान मिळवल्यामुळे, क्रिकेटच्या मर्यादीत षटकाच्या फॉरमेटमध्ये पुन्हा एकदा कोहलीचे वर्चस्व पाहायला मिळाले.
Web Summary : Virat Kohli now leads in limited overs cricket, surpassing Sachin Tendulkar's record. Scoring an unbeaten 74 against Australia, Kohli reached 18,437 runs, surpassing Tendulkar's 18,436. Kohli also holds second position in ODIs, solidifying his dominance.
Web Summary : विराट कोहली लिमिटेड ओवर्स क्रिकेट में सबसे ज्यादा रन बनाने वाले बल्लेबाज बने, सचिन तेंदुलकर का रिकॉर्ड तोड़ा। ऑस्ट्रेलिया के खिलाफ नाबाद 74 रन बनाकर कोहली ने 18,437 रन बनाए, जो तेंदुलकर के 18,436 रनों से अधिक है। कोहली वनडे में भी दूसरे स्थान पर हैं।