Join us

दिवाळीच्या सेलिब्रेशनमध्ये विराट कोहली लगावले ठुमके

पार्टीमध्ये विराटशिवाय मनज्योत कार्ला, श्रेयस अय्यर, इशान किशन, अरमान मलिक आणि बास्केटबॉल खेळाडू सतनाम सिंगही उपस्थित होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 16:24 IST

Open in App
ठळक मुद्देभारताचा कर्णधार विराट कोहलीने दिवाळीपूर्वीच या सणाचे सेलिब्रेशन केले.

मुंबई : क्रिकेटपटूंना बऱ्याचदा दौऱ्यांमुळे दिवाळी साजरी करता येत नाही. त्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहलीनेदिवाळीपूर्वीच या सणाचे सेलिब्रेशन केले. या सेलिब्रेशनमध्ये कोहली ठुमके लगावताना पाहायला मिळाला.

हे सेलिब्रेशन घडलं मुंबईतील धारावीमध्ये. समाजातील दुर्लक्ष झालेल्या मुलांना सांभाळण्यासाठी एक संस्था काम करते. या मुलांना दिवाळीचा आनंद लुटता यावा, अशी या संस्थेतील व्यक्तींची इच्छा होती. त्यांनी ही गोष्ट कोहलीला सांगितली आणि तोही यासाठी तयार झाला. त्यामुळे धारावी या मुलांसाठी खास दिवाळीची पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीमध्ये विराटशिवाय मनज्योत कार्ला, श्रेयस अय्यर, इशान किशन, अरमान मलिक आणि बास्केटबॉल खेळाडू सतनाम सिंगही उपस्थित होते. या सर्वांनी या मुलांशी संवाद साधला. त्यांना भेटवस्तू दिल्या. 

या पार्टीमध्ये अरमानच्या गाण्यावर कोहलीला डान्स करण्याची विनंती करण्यात आली. कोहलीने या मुलांच्या विनंतीचा मान ठेवला आणि त्याने चांगले ठुमकेही लगावले. 

टॅग्स :विराट कोहलीदिवाळी