Join us

कोहलींच्या घरात आला 'ज्युनियर विराट'! अनुष्काने दिला गोंडस बाळाला जन्म; नावही केलं जाहीर

विराट कोहलीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिली 'खुशखबर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 21:01 IST

Open in App

Virat Kohli blessed with Baby Boy: टीम इंडियाचा दमदार फलंदाज विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना पुत्ररत्न प्राप्ती झाल्याची बातमी विराटने नुकतीच दिली. ५ दिवसांपूर्वी म्हणजे १५ फेब्रुवारीला विराट-अनुष्का दुसऱ्यांदा आई-बाबा झाले. विराट कोहलीने सध्या सुरु असलेल्या इंग्लंड विरूद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली होती. त्याचवेळी अनुष्का गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण विराटने याबाबत काहीही वाच्यता केली नव्हती. विराटचा जवळचा मित्र आणि दक्षिण आफ्रिकन माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स याबद्दल बोलला होता. पण इतके दिवस लपवून ठेवलेलं 'गोड गुपित' अखेर आज विराटने उघड केले. विराटने आपल्या मुलाचे नाव 'अकाय' असे ठेवले आहे.

"आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, १५ फेब्रुवारी रोजी आम्ही आमचा मुलगा याचे स्वागत केले. वामिकाच्या धाकट्या भावाचे नाव या जगात स्वागत केले. आमच्या आयुष्यातील या सुंदर काळात आम्ही तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मागतो. आम्ही तुम्हाला विनंती करतो की आमच्या गोपनीयतेचा आदर करा. धन्यवाद," अशा शब्दांत विराट आणि अनुष्काने आपल्या चाहत्यांना संदेश दिला.

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मा