Join us
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहलीची BCCI कडे विनंती, म्हणाला पत्नीला सोबत राहु द्या ना!

भारताचा कर्णधार विराट कोहलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) एक विनंती केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 10:50 IST

Open in App

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) एक विनंती केली आहे. त्या विनंतीत त्याने परदेश दौऱ्यावर खेळाडू व साहाय्यक कर्मचाऱ्यांना आपापल्या पत्नीसोबत राहण्याची परवानगी मागितली आहे. BCCIच्या नियमानुसार परदेश दौऱ्यातील खेळाडू व साहाय्यक कर्मचारी यांनी त्यांच्या पत्नीसोबत केवळ दोन आठवडे राहता येत होते. मात्र, कोहलीने संपूर्ण दौऱ्यात त्यांना सोबत राहण्याची विनंती केली आहे. 

कोहलीने प्रथम बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे ही विनंती व्यक्त केली. त्याने ही विनंती प्रशासकीय समितीसमोर मांडली जाईल याचीही दक्षता घेतली. कोहलीने तशी विनंती केल्याच्या वृत्ताला प्रशासकीय समितीच्या सुत्रांनी दुजोरा दिला. मात्र, या नियमात तुर्तास तरी बदल होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय संघाचे व्यवस्थापक सुनील सुब्रमणियम यांनीही लेखी स्वरूपात विनंती अर्ज दिला आहे.  

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्माबीसीसीआय