Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रेक्षकांची देशभक्ती पाहून भावूक झाला विराट, मानले सर्वांचे आभार

इंग्लंडविरूद्धच्या तिस-या वन डे सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने चाहत्यांसाठी भावूक मॅसेज लिहिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 13:24 IST

Open in App

नवी दिल्ली - इंग्लंडविरूद्धच्या तिस-या वन डे सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने चाहत्यांसाठी भावूक मॅसेज लिहिला आहे. विराटने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, त्यात सामन्याच्या सुरूवातीला सुरू असलेल्या राष्ट्रगीताच्या वेळी स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षक शिस्तीत उभे राहून राष्ट्रगीत गात आहेत. प्रेक्षकांच्या या देशभक्तीवर विराट फिदा झाला असून त्याने त्यांचे आभारही मानले आहेत.व्हिडिओ शेअर करताना विराटने लिहिले की, या व्हिडीओ पाहून खूप आनंद मिळाला. कोणत्याही अटीशिवाय आम्हाला पाठींबा देण्यासाठी तुम्हा सर्वांचे आभार. तुमचे हेच प्रेम आम्हाला अधिक मेहनत करण्याची प्रेरणा देते.  भारत आणि इंग्लंड यांच्यातील वन डे मालिकेचा शेवटचा सामना आज होणार आहे. पहिल्या सामन्यात भारताने आठ विकेट्स राखून विजय मिळवला होता, तर इंग्लंडने 86 धावांनी दुसरा सामना जिंकून मालिका 1-1 अशा बरोबरीत आणली होती. तिसरा सामना जिंकल्यास भारताच्या नावावर एक विक्रम नोंदवला जाईल. दोन देशांच्या मालिकेतील त्यांचा हा सलग दहावा मालिका विजय ठरेल.  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीक्रिकेटक्रीडा