Join us
Daily Top 2Weekly Top 5

"इश्क है ये...!" RCB नं शेअर केलेला 'विरुष्का'चा खास व्हिडिओ पाहिलात का?

या जोडीनं आदर्श जोडी कशी असावी याचे उत्तम उदाहरण सेट केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 17:23 IST

Open in App

भारतीय क्रिकेट संघातील महान फलंदाज विराट कोहली आणि त्यांची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा जोडीची तगडी पार्टनरशिप नेहमीच चर्चेचा विषय ठरते. क्रिकेट आणि बॉलिवूडमधील अनेक जोड्या जमल्या. पण या जोडीला तोड नाही. ११ डिसेंबर २०१७ रोजी या इटलीत एका खासगी सोहळ्यात दोघांनी लग्न उरकले होते. लग्नाच्या ८ वा वाढदिवस साजरा करणाऱ्या या जोडीला IPL मधील आरसीबी फ्रँचायझी संघाने खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. RCB च्या संघाने आपल्या अधिकृत अकाउंटवरुन किंग कोहली आणि अनुष्काचा शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

RCB ची खास पोस्ट, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

विराट-अनुष्का ही गेल्या काही वर्षांतील भारतातील सर्वात लोकप्रिय जोड्यांपैकी एक ठरली आहे. ‘विरुष्का’च्या आठव्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आरसीबीसह दोघांच्या चाहत्यांनी खास अंदाजात या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव केला. RCB नं खास व्हिडिओसह या जोडीला हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिलंय की. "विरुष्काने सहजपणे पूर्ण केलेले ‘कपल गोल्स’. आमच्या आवडत्या विराट आणि अनुष्काला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. येणारी वर्षे आणखी सुंदर, आनंद घेऊन येवोत. तुम्ही दोघेही एकमेकांना आणि संपूर्ण जगाला अशीच प्रेरणा देत राहा.”

लग्नाआधी ती ट्रोल झाली, पण...

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लव्ह स्टोरी एकदम हिट आहे. डेटिंगचा खेळ सुरु असताना अनुष्का शर्मा  स्टेडियममध्ये येऊन किंग कोहलीला चीअर करतानाही दिसायची. २०१४ चा इंग्लंड दौरा कोहलीसाठी भयावह स्वप्नासारखा होता. त्याच्या फ्लॉप शोनंतर क्रिकेट चाहत्यांनी अनुष्कालाही ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले. पण या जोडीनं या सगळ्या गोष्टी फोल ठरवत एक आदर्श जोडी कशी असावी याचे उदाहरण सेट केले. ज्या अनुष्काला लोकांना ट्रोल केलं ती विराट कोहलीची सपोर्ट सिस्टीम झाली. वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील पराभव असो किंवा टी-२० वर्ल्ड कपसह RCB  चॅम्पियन झाल्याचा आनंदोत्सव प्रत्येक वेळी अनुष्का विराटच्या सोबत दिसली. सेलिब्रिटी पॉवर कपलच्या यादीत अगदी टॉपला असणाऱ्या या जोडीनं आपल्या भागिदीरीचं आणखी एक वर्ष पूर्ण केल्यावर चाहते त्यांना भरभरून शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Love is This: RCB Shares Special 'Virushka' Video, Have You Seen It?

Web Summary : RCB wished Virat Kohli and Anushka Sharma a happy anniversary with a special video. The couple, married in 2017, are celebrated by fans. Anushka supported Virat through tough times, becoming his strength.
टॅग्स :विराट कोहलीविराट अनुष्का लग्नअनुष्का शर्माऑफ द फिल्ड