Virat Kohli's instagram story : Vamikaचे फोटो व्हायरल झाल्यावर विराट कोहली- अनुष्का शर्मा यांची पहिली प्रतिक्रिया; त्या कॅमेरामनबद्दल म्हणाले...

Virat Kohli & Anushka Sharma's instagram story about clicking pictures of Vamika : जोपर्यंत आपल्या मुलीला सोशल मीडिया आणि इत्यादी गोष्टींची समज येत नाही तोवर तिला प्रसिद्धीपासून दूर ठेवण्याचा मानस विराट कोहली आणि अनुष्का यांनी याआधीच बोलून दाखवला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 11:30 AM2022-01-24T11:30:28+5:302022-01-24T11:36:10+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli & Anushka Sharma's instagram story about clicking pictures of Vamika yesterday during 3rd match between IND vs SA | Virat Kohli's instagram story : Vamikaचे फोटो व्हायरल झाल्यावर विराट कोहली- अनुष्का शर्मा यांची पहिली प्रतिक्रिया; त्या कॅमेरामनबद्दल म्हणाले...

Virat Kohli's instagram story : Vamikaचे फोटो व्हायरल झाल्यावर विराट कोहली- अनुष्का शर्मा यांची पहिली प्रतिक्रिया; त्या कॅमेरामनबद्दल म्हणाले...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Virat Kohli & Anushka Sharma's instagram story about clicking pictures of Vamika : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तिसऱ्या वन डे सामन्यात भारताच्या पराभवापेक्षा अधिक चर्चा रंगली ती विराट कोहलीच्या कन्येची... एक वर्ष कॅमेरामनच्या नजरेतून वाचलेल्या वामिकाचा ( Vamika) फोटो व्हायरल झाला अन् तिच्या क्यूटनेसनं नेटिझन्स वेडे झाले. सोशल मीडियावर दिवसभर वामिकाचेच फोटो व्हायरल होताना दिसले. विराटनंही अर्धशतकानंतर वामिकाकडे पाहून विशेष सेलिब्रेशन केलं. पण, काल व्हायरल झालेल्या वामिकाच्या फोटोनंतर विराट कोहलीअनुष्का शर्मा यांनी इंस्टा स्टोरीतून पहिली प्रतिक्रिया दिली. 

जोपर्यंत आपल्या मुलीला सोशल मीडिया आणि इत्यादी गोष्टींची समज येत नाही तोवर तिला प्रसिद्धीपासून दूर ठेवण्याचा मानस विराट कोहली आणि अनुष्का यांनी याआधीच बोलून दाखवला होता. त्याबाबत दोघं वारंवार खूप काळजी देखील घेत असल्याचं दिसून येतं. आपल्या भोवताली घडणाऱ्या गोष्टींची समज वामिकाला आली आणि ती तिचे निर्णय घेण्यास सक्षम झाल्यानंतर आम्ही तिला अडवणार नाही'', असंही कोहली म्हणाला होता. 

विराट व अनुष्का यांनी इंस्टा स्टोरीमध्ये काय लिहिलंय?
''आमच्या मुलीचा फोटो काल टीपला गेला अन् तो प्रचंड व्हायरल झाला. आम्हाला तुम्हाला हे सांगायचे आहे की कॅमेरामन आमचे छायाचित्र टिपतोय हे माहित नव्हतं. या प्रकरणी आमचं आजही तेच मत आहे. त्यामुळे वामिकाचे फोटो काढले किंवा छापले जाणार नाहीत, याची कृपया करून काळजी घ्या. यामागचं कारण मी आधीच सांगितलं आहे'',अशा प्रकारची स्टोरी विराट-अनुष्कानं पोस्ट केली आहे. 

Web Title: Virat Kohli & Anushka Sharma's instagram story about clicking pictures of Vamika yesterday during 3rd match between IND vs SA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.