Join us

विराट कोहली-अनुष्का शर्मा यांनी भटक्या प्राण्यांसाठी मुंबईत सुरू केली दोन निवारा केंद्र!

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी मुंबईतील भटक्या प्राण्यांसाठी दोन निवारा केंद्र सुरू केली आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 10:56 IST

Open in App

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी मुंबईतील भटक्या प्राण्यांसाठी दोन निवारा केंद्र सुरू केली आहेत. विराटनं सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली.  World Stray Animals’ Dayला विराट-अनुष्कानं ही घोषणा केली. विराट कोहली फाऊंडेशन आणइ व्हिव्हाल्डीस अॅनिमल हेल्थ ( Virat Kohli Foundation and Vivaldis Animal Health) यांच्या संयुक्त विद्यामानं ही केंद्र चालवली जाणार आहेत.  मालाड व बोईसर येथे हे निवारा केंद्र असणार आहे. क्विंटन डी कॉकनं पाकिस्तानी फलंदाजाचा 'पोपट' केला, मोठा वादच निर्माण झाला; Video

व्हिव्हाल्डीस अॅनिमल हेल्थ ही भारतातील अग्रगण्य संस्था आहे जी प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेते. विराटनं लिहिलं की,''प्राण्यांची काळजी घेणे मला आवडते आणि असा काही तरी प्रोजेक्ट करावा ही माझी इच्छा होतीच. अनुष्काचीही मला साथ मिळत आहे. भारताताली भटक्या प्राण्यांना मदत करण्याचं तिचं व्हिजन होतं आणि तिच्याकडून त्याबाबत ऐकताना मलाही प्रेरणा मिळाली. त्यानंतर मी प्राण्यांच्या हक्काबाबत जाणून घेतलं आणि त्यांना त्वरित वैद्यकिय मदत कशी मिळेल, याचा अभ्यास केला. आपल्या या शहरात भटक्या प्राण्यांसाठी सुरक्षित ठिकाण तयार करण्याचं आमचं स्वप्न आहे.'' Fakhar Zaman : फखर जमानवर झाला अन्याय; भारतीय चाहते विसरले पाकिस्तानसोबतचे वैर अन्...

 

 

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मा