Join us

अनुष्का शर्माकडून विराटची स्लेजिंग; विकेट पडल्यावर कोहलीच्या सेलिब्रेशनची केली कॉपी, Video  

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दोघेही एका कार्यक्रमादरम्यान स्टेजवर एकत्र दिसत होते. यादरम्यान अनुष्का शर्माला अनेक प्रश्न विचारले गेले आणि तिनेही बिनधास्त उत्तरं दिली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 14:32 IST

Open in App

क्रिकेटच्या मैदानात आपल्या आक्रमक शैलीमुळे विराट कोहली ( Virat Kohli) चांगलाच चर्चेत असतो. कोहली ज्या पद्धतीने मैदानात सेलिब्रेशन करतो, ते पाहून चाहते अनेकदा त्याला ट्रोलही करतात. पण आता कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने त्याला सर्वांसमोर याच सेलिब्रेशनवरून स्लेज केले आहे. अनुष्काच्या या स्लेजिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनुष्काच्या स्लेजिंगवर कोहली कोणतेच प्रत्युत्तर देऊ शकला नाही.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दोघेही एका कार्यक्रमादरम्यान स्टेजवर एकत्र दिसत होते. यादरम्यान अनुष्का शर्माला अनेक प्रश्न विचारले गेले आणि तिनेही बिनधास्त उत्तरं दिली. या व्हिडिओमध्ये आधी अनुष्काला सांगितले आहे की, ती कोहलीचा नंबर कोणत्या नावाने तिच्या मोबाईलमध्ये सेव्ह करते. यावर अनुष्का म्हणाली की पती हा देव आहे. मात्र, नंतर तिने त्याची फिरकी घेतली. 

क्रिकेटच्या मैदानात जेव्हा जेव्हा त्याच्या संघाचा गोलंदाज विकेट घेतो तेव्हा कोहलीचे सेलिब्रेशन पाहण्यासारखे असते. यावर अनुष्काने कोहलीची फिरकी घेतली आणि म्हणाली, कधी कधी विकेट घेणारा गोलंदाजही जेवढं सेलिब्रेशन करत नाही तेवढं विराट करतो. जणू गोलंदाजाने नाही, तर  त्याने विकेट घेतली आहे. यावर कोहली म्हणतो की हे सर्व काही क्षणात घडते. यावर लक्ष केंद्रित करू नये. कार्यक्रमात अनुष्का नंतर विकेटकीपिंग करताना दिसले आणि कोहली फलंदाजी करत आहे. अनुष्का मागून कोहलीला सांगते की आज २४ एप्रिल आहे, किमान आज तरी धावा कर. यावर विराट म्हणतो की, एप्रिल, मे आणि जूनमध्ये तुमच्या टीमने तितक्या धावा केल्या नाहीत. मी त्यापेक्षा जास्त सामने खेळले आहेत. कोहलीने असे म्हणताच अनुष्काने त्याला  मिठी मारली.

विराट कोहलीने आयपीएल २०२३ च्या मोसमात धडाकेबाज फलंदाजी केली आणि १४ सामन्यांमध्ये ५३.२५ च्या सरासरीने ६३९ धावा केल्या. त्यात दोन शतकं आणि सहा अर्धशतकं झळकावले आहेत. मात्र, आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी इंग्लंडला पोहोचला आहे. 

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मा
Open in App