Join us

बॅट से मारूंगा, बैठ जा! विराट कोहली-रिषभ पंत यांच्यात मजेशीर बाचाबाची; Video Viral 

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना RCB ने जिंकला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 18:40 IST

Open in App

IPL 2024, DC vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना RCB ने जिंकला. एका सामन्याच्या बंदीमुळे रिषभ पंतला या सामन्यात खेळता आले नव्हते. त्यामुळे तो स्टँडमध्ये बसून मॅच पाहत होता, परंतु तो तिथे बसून विराट कोहलीची खोड काढताना दिसला आणि त्याचा व विराटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बंगळुरूने हा सामना ४७ धावांनी जिंकला.

RCB विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार सहभागी झाला नव्हता. विराट फलंदाजी करत असताना पंतने त्याला त्रास देण्यास सुरुवात केली. कोहली फलंदाजी करत असताना पंत ड्रेसिंग रूममध्ये उभा होता. विराटने हे पाहिले आणि त्याला खाली बसण्यास सांगितले. यानंतर पंत हसायला लागला आणि बसला. दोघांमध्ये झालेली ही मजेशीर बाचाबाची सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. RCB ने १८७ धावा केल्या आणि त्यात कोहलीच्या १२ चेंडूंत २७ धावा होत्या. रजत पाटीदारने अर्धशतक आणि विल जॅकने ४१ धावा करत संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले. लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाने सातत्याने विकेट गमावल्या. संघाचा कर्णधार अक्षर पटेलने अर्धशतक झळकावले, परंतु दुसऱ्या बाजूने फलंदाज बाद होत राहिले.  

टॅग्स :आयपीएल २०२४विराट कोहलीरिषभ पंतऑफ द फिल्ड