Join us
Daily Top 2Weekly Top 5

विराट आणि अनुष्का पुन्हा झाले ट्रोल, ऑस्ट्रेलियातील या फोटोने केला घात

विराट आणि अनुष्का यांनी एक फोटो काढला आणि या फोटोमुळे ते सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 16:16 IST

Open in App

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांचा एक फोटो पुन्हा एकदा वायरल झाला आहे. विराट आणि अनुष्का हे दोघेही ऑस्ट्रेलियामध्ये फिरत होते. त्यावेळी त्यांनी एक फोटो काढला आणि या फोटोमुळे ते सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहेत.

विराट आणि अनुष्का हे जेव्हा एकत्र येतात, तेव्हा बऱ्याचदा ते ट्रोल होतात, असे पाहिले गेले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये विराट गेल्या दीड महिन्यांपासून आहे. विराटच्या नेतृत्वाखाली भारताने कसोटी आणि त्यानंतर एकदिवसीय मालिकाही जिंकली. एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर विराट अनुष्काबरोबर फिरायला गेला होता. यावेळी या दोघांनी बरेच फोटो काढले. पण चाहत्यांनी मात्र त्यांना यावेळी चांगलेच धारेवर धरले आहे.

शनिवारी विराट आणि अनुष्का हे दोघे ऑस्ट्रेलियन ओपन पाहायला गेले होते. यावेळी विराट आणि अनुष्का यांनी टेनिसमधील दिग्गज खेळाडू रॉजर फेडररसह फोटो काढला. हा फोटो त्यांनी आपल्या इंस्टाग्रामवर शेअरही केली. त्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन या स्पर्धेने आपल्या ट्विटर हँडलवरून या तिघांचा फोटो शेअर केला. हा फोटो शेअर केल्यावर त्यांनी, एका फोटोमध्ये तीन महान व्यक्तींना पाहा, अशी कॅप्शन दिली होती. यानंतर लोकांनी विराट आणि अनुष्का यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मारॉजर फेडररऑस्ट्रेलियन ओपन