Join us

विराट आणि अनुष्काने घेतली रॉजर फेडररची भेट

भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्रीही यावेळी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा पाहायला गेले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 16:16 IST

Open in App

सिडनी : कसोटी पाठोपाठ भारताने ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय मालिकाही जिंकली. आता भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. पण सध्याच्या घडीला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पत्नी अनुष्का शर्माबरोबर काही वेळ व्यतित करत आहे.

सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा सुरु आहे. कोहली हा अव्वल टेनिसपटू रॉजर फेडररचा फॅन आहे. यापूर्वीही कोहली विम्बल्डन स्पर्धा सुरु असताना फेडररचा खेळ पाहायला गेला होता. आता तर त्याने चक्क फेडररची भेट घेतली आहे. विराट आणि अनुष्का यांनी फेडररबरोबर एक फोटो काढला आहे. विराटने हा फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्रीही यावेळी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा पाहायला गेले होते.

टॅग्स :विराट कोहलीरॉजर फेडररअनुष्का शर्माऑस्ट्रेलियन ओपन