Join us

अखेर ठरलं? विराट आणि अनुष्काचा 9 ते 12 डिसेंबरदरम्यान वाजणार 'बॅण्डबाजा'

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचं लवकरच शुभमंगल होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 18:38 IST

Open in App

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचं लवकरच शुभमंगल होणार असल्याचं वृत्त आहे. येत्या आठवड्यात दोघं लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. 9 ते 12 डिसेंबर दरम्यान हा विवाह सोहळा रंगणार आहे. मीडियामध्ये सुरू असलेल्या चर्चेनुसार इटलीमध्ये हा विवाह होणार असल्याची माहिती आहे. मात्र, दोघांकडूनही याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.  

येत्या 9 ते 12 डिसेंबर दरम्यान दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. दोघांनी डेस्टिनेशन वेडिंग करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी त्यांनी इटलीची निवड केल्याची माहिती आहे. हिंदू पद्धतीने दोघे विवाहबद्ध होणार असल्याची माहिती आहे. बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील मान्यवर या लग्नसोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे समजते. विराट आणि अनुष्का यांच्या परिवाराची इटलीची तिकीटं आधीच बूक झाली असल्याची माहिती आहे. 

भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरू असलेली कसोटी मालिका आजच संपली असून येत्या 10 डिसेंबरपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. मात्र विराटला या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. अति क्रिकेट आणि रोटेशन पॉलिसीमुळे विराट कोहलीला विश्रांती दिल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र लग्नासाठीच विराटला श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेतून विश्रांती देण्यात आल्याची चर्चा आहे.  

विराट-अनुष्काची ब्युटीफुल लव्ह स्टोरी चार वर्षांपूर्वी सुरु झाली होती. त्यावेळी हे दोघे पहिल्यांदा एका कमर्शिअल अॅडमध्ये एकत्र झळकले होते.

 

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्माविराट कोहली लग्न