Join us

Virat Kohli 100th Test : विराट कोहलीच्या चाहत्यांपुढे अखेर BCCI ला झुकावंच लागलं! १००व्या कसोटीसाठी ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवानगी, पुन्हा स्टेडियममध्ये घुमणार King Kohli च्या नावाचा जयघोष

श्रीलंका मालिकेतील पहिली कसोटी ही विराटची १००वी कसोटी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 20:03 IST

Open in App

Virat Kohli 100th Test vs BCCI : भारतीय संघाची दोन सामन्यांची कसोटी मालिका ४ मार्चपासून सुरू होणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. त्यात महत्त्वाची बाब म्हणजे विराट कोहलीचा हा १००वा कसोटी सामना असणार आहे. कोरोनाच्या नियमांमुळे या सामन्यासाठी प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली नव्हती. पण इतर सामन्यांसाठी प्रेक्षकांना परवानगी असताना हाच सामना अशा प्रकारचा खेळवण्यामागे BCCIचं गलिच्छ राजकारण जबाबदार असल्याचं मत अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर मांडल्याचं दिसलं. त्यानंतर आता या सामन्यात स्टेडियमच्या ५० टक्के क्षमतेइतक्या प्रेक्षकांना प्रवेश मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता स्टेडियममध्ये विराटच्या नावाचा जयघोष होणार हे नक्की झालं आहे.

कसोटी सामन्यासाठी जे लोक स्टेडियममध्ये ऑन ड्युटी असतील, त्यांना वगळता इतर कोणालाही स्टेडियमच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही, असं पंजाब बोर्डाने सांगितलं होतं. BCCI ने ठरवून दिलेल्या कोविडच्या नियमांनुसारच हा निर्णय घेण्यात आला आहे. मोहाली आणि आसपासच्या भागात कोविडच्या काही केसेस आढळल्या आहेत. त्यामुळे सावधगिरी बाळगत हा निर्णय घेण्यात आला आहे, असंही स्पष्ट करण्यात आलं होतं. तसेच, विराटसाठी हा मोठा सामना असल्याने संपूर्ण स्टेडियममध्ये विराटचे मोठे बॅनर्स लावून सजावट केली जाईल, असं सांगण्यात आलं होतं. पण चाहत्यांनी या प्रकरणात BCCI राजकारण खेळत असल्याचा आरोप सोशल मीडियावर केला. त्यानंतर अखेर आता पहिल्या कसोटी सामन्यात प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.

'विराटबद्दल सुरू असलेलं गलिच्छ राजकारण थांबवा'; चाहत्यांचा संताप

पंजाबच्या धर्मशालामध्ये झालेल्या दोन टी२० सामन्यात प्रेक्षक मोठ्या संख्येने हजर होते. बंगळुरूत होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठीही प्रेक्षकांच्या हजेरीला परवानगी देण्यात आली आहे. पण विराटच्या १००व्या सामन्याच्या कसोटीसाठी मात्र प्रेक्षकांविना सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे चाहत्यांना मात्र यात बीसीसीआयचं गलिच्छ राजकारण दिसत असून हे राजकारण थांबवा असा संताप सोशल मीडियावरून व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाविराट कोहलीबीसीसीआय
Open in App