ब्रायन लाराच्या संघात विराट व बुमराहला स्थान

Cricket News : विंडीजचा माजी महान फलंदाज ब्रायन लाराने निवडलेल्या सध्याच्या काळातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये दोन भारतीय विराट कोहली व जसप्रीत बुमराह यांना स्थान मिळाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 04:41 IST2020-12-07T04:40:42+5:302020-12-07T04:41:52+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Virat and Bumrah's place in Brian Lara's team | ब्रायन लाराच्या संघात विराट व बुमराहला स्थान

ब्रायन लाराच्या संघात विराट व बुमराहला स्थान

नवी दिल्ली : विंडीजचा माजी महान फलंदाज ब्रायन लाराने निवडलेल्या सध्याच्या काळातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये दोन भारतीय विराट कोहली व जसप्रीत बुमराह यांना स्थान मिळाले आहे. वर्तमान काळात वर्चस्व गाजवणाऱ्या अनेक खेळाडूंचा लाराच्या संघात समावेश आहे. संघात पाच गोलंदाज व पाच फलंदाजांचा समावेश आहे. पण, आश्चर्याची बाब म्हणजे या संघात पाकिस्तान, श्रीलंका, वेस्ट इंडिज यासारख्या संघातील खेळाडूंना स्थान मिळालेले नाही. 
 या व्यतिरिक्त लाराने त्याच्या कारकिर्दीत खेळलेल्या सर्वोत्तम खेळाडूंचीही निवड केली आहे. त्यात सचिन तेंडुलकर, रिकी पॉन्टिंग, जॅक कॅलिस, कुमार संगकारा, राहुल द्रविड, वसीम अक्रम, शेन वॉर्न, वकार युनिस, मुथय्या मुरलीधरन, ग्लेन मॅक् ग्रा आदींचा समावेश आहे, पण अनिल कुंबळेसारख्या दिग्गजाचे नाव नसणे आश्चर्यचकित करणारे आहे. अनिल कुंबळेने जगातील प्रत्येक कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या देशाविरुद्ध बळी घेतले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो तिसऱ्या स्थानी आहे. त्याने वॉर्न व मुरलीधरन व्यतिरिक्त तीन वेगवान गोलंदाजाची निवड केली आहे. 
लारा इलेव्हन : विराट कोहली, केन विलियम्सन, जो रुट, एबी डिव्हिलियर्स, स्टीव्ह स्मिथ, जसप्रीत बुमराह, जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, कॅगिसो रबाडा, राशिद खान.

Web Title: Virat and Bumrah's place in Brian Lara's team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.