Join us
Daily Top 2Weekly Top 5

U19 World Cup : १७ वर्षीय बॅटरचं द्विशतक हुकलं! पण विश्वविक्रमासह वैभव सूर्यवंशीसमोर ठेवलं चॅलेंज

युवा टीम इंडियाच्या वैभव सूर्यवंशीमध्ये हा विक्रम मोडण्याची धमक, तो मोठा डाव साधणार का? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 20:54 IST

Open in App

आयसीसीच्या १९ वर्षांखालील पुरुष विश्वचषक स्पर्धेतील २०२६ च्या हंगामात श्रीलंकेचा युवा फलंदाज विरान चामुदिथाने याने नवा  इतिहास रचला आहे. जपानविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात चामुदिथाने १९२ धावांची वादळी खेळी केली. या खेळीसह त्याने या स्पर्धेत एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. त्याची ही खेळी भारतीय युवा बॅटर वैभव सूर्यवंशीसाठी एक चॅलेंजच आहे. इथं जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

द्विशतक अवघ्या ८ धावांनी हुकलं, पण...

बुलावायो येथील मैदानात रंगलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतीव जपान विरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेच्या चामुदिथाने १४३ चेंडूत  २६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १९२ धावांची खेळी साकारली. त्याचे द्विशतक अवघ्या ८ धावांनी हुकले, पण या खेळीसह त्याने आपल्या देशाच प्रतिनीधित्व करताना हसीथा बोयागोडा याच्या नावे असणाऱ्या विश्वविक्रम मोडीत काढला आहे. बोयागोडाने २०१८ च्या हंगामात केनियाविरुद्धच्या सामन्यात१९१ धावांची खेळी केली होती. चामुदिथाची खेळी जपानच्या गोलंदाज टिमोथी मूरने थांबवली, पण तोपर्यंत तो इतिहास रचून गेला होता.

वैभव सूर्यवंशीचा नवा विश्वविक्रम; विराटलाही टाकलं मागं, 'अशी' कामगिरी करणारा तिसरा भारतीय!

आयसीसी पुरुष U19 विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वैयक्तिक धावांचा रेकॉर्ड

  • १९२ धावा- विरान चामुदिथा (श्रीलंका) विरुद्ध जपान, १७ जानेवारी २०२६
  • १९१ - हसीथा बोयागोडा (श्रीलंका) विरुद्ध केनिया, २०१८
  • १८०- जेकब भुला (न्यूझीलंड) विरुद्ध केनिया, २०१८
  • १७६ - डोनोव्हन पॅगन (वेस्ट इंडिज) विरुद्ध स्कॉटलंड, २००२
  • १७४ - डॅन लॉरेन्स (इंग्लंड) विरुद्ध फिजी, २०१६

दिमांथाची ऐतिहासिक भागीदारी

विरान चामुदिथा इथेच थांबला नाही. तर त्याने दिमांथा महावितानासोबत मिळून पहिल्या विकेटसाठी ३२८ धावांची विक्रमी भागीदारी रचली. १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत कोणत्याही विकेटसाठीची ही सर्वोच्च भागीदारी ठरली.  

U19 विश्वचषक स्पर्धेतील सर्वोच्च भागीदारीचा विक्रम

  • दिमांथा महाविताना आणि विरान चामुदिथा (श्रीलंका)- ३२८ विरुद्ध जपान, १७ जानेवारी २०२६
  • डॅन लॉरेन्स आणि जॅक बर्नहॅम (इंग्लंड) - ३०३ विरुद्ध फिजी, २७ जानेवारी २०१६
  • ब्रॅड विल्सन आणि बीजे वॉटलिंग (न्यूझीलंड) - २७३ विरुद्ध स्कॉटलंड, १९ फेब्रुवारी २००४
  • जेसन सांघा आणि नाथन मॅकस्वीनी (ऑस्ट्रेलिया) - २५० विरुद्ध पापुआ न्यू गिनी , १९ जानेवारी २०१८
  • रचिन रविंद्र आणि जेकब भुला (न्यूझीलंड)- २४५ विरुद्ध केनिया, १७ जानेवारी २०१८

युवा टीम इंडियाच्या वैभव सूर्यवंशीमध्ये हा विक्रम मोडण्याची धमक, तो मोठा डाव साधणार का? 

यंदाच्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत युवा टीम इंडियातील वैभव सूर्यवंशीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. प्रत्येक सामन्यात तो नवा विक्रम प्रस्थापित करत आहे. या स्पर्धेतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आणि भागीदारीच्या विक्रमाच्या यादीत पहिल्या पाचमध्ये एकाही भारतीय खेळाडूचे नाव दिसत नाही. हा विश्वविक्रम मोडीत काढण्याची धमक वैभव सूर्यवंशीमध्ये आहे. तो यंदाच्या हंगामात मोठा धमाका करत हा डाव साधणार का? ते पाहण्याजोगे असेल.

 

English
हिंदी सारांश
Web Title : U19 World Cup: Record-breaking Innings Sets Challenge for Vaibhav Suryavanshi

Web Summary : Sri Lanka's Viran Chamuditha's 192-run innings in the U19 World Cup set a new record. He surpassed Hasitha Boyagoda's previous best. This creates a challenge for India's Vaibhav Suryavanshi, with expectations high for him to break the record.
टॅग्स :19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप