Join us  

1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाला मिळायचे इतके मानधन; Viral Photo पाहून विश्वास बसणार नाही

जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली 66 व्या स्थानावर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 11:24 AM

Open in App
ठळक मुद्देविराट कोहली, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा यांचं वर्षाचं मानधन 7 कोटीस्थानिक स्पर्धांमध्ये खेळणारा क्रिकेटपटू कमावतो लाखांत

क्रिकेटमध्ये आजच्या घडीला बरेच बदल पाहायला मिळत आहेत... काळ उलटला अन् क्रिकेटमध्ये बरेच नवीन तंत्रज्ञान आले, जर्सीचा रंग बदलला, नियम बदलले आणि खेळण्याची शैलीही बदलली. त्यासह खेळाडूंच्या मानधनातही घसघशीत वाढही झाली. आज जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली 66 व्या स्थानावर आहे. बीसीसीआयच्या करारातून त्याला वर्षाला 7 कोटी पगार मिळतो. त्याशिवाय सोशल मीडिया, जाहीराती यातून येणारा पैसा वेगळा. पण, तुम्हाला माहित आहे का की 1983 साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या खेळाडूंना दिवसाला किती मानधन मिळायचे? सध्या कपिल देव यांच्या टीमच्या मानधनाची एक यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

पाकिस्तानात चाललंय काय? मोहम्मद हाफिजचा कोरोना रिपोर्ट 72 तासांत पॉझिटिव्ह-निगेटिव्ह-पॉझिटिव्ह

आताच्या घडीला क्रिकेटपटून लाखो-कोटीच्या घरात मानधन घेतात, परंतु 20-25 वर्षांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. कपिल देव आणि सुनील गावस्कर या दिग्गज खेळाडूंना फार कमी पैसे मिळायचे. 1983मध्ये जेव्हा भारतीय संघाने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप उंचावला होता, तेव्हा मिळालेली बक्षीस रक्कम ही तुटपूंजी होती.  सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोत भारतीय संघातील खेळाडूंना मिळणारे मानधन लिहिले आहे. 21 सप्टेंबर 1983च्या वन डे मालिकेतील हा फोटो आहे. त्यावेळी बिशन सिंग बेदी हे मॅनेजर होते.  

या यादीनुसार मॅनेजरसह सर्व खेळाडूंना 1500 रुपये मॅच फी मिळत होती. यात 200 रुपये प्रतिदीन असा भत्ता दिला जात असल्याची नोंद आहे. यानुसार खेळाडूंना एकूण 2100 रुपये दिले जात होते. आजच्या घडीचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीला वर्षाला 7 कोटी रुपये मिळतात. स्थानिक क्रिकेटमध्ये चार दिवसांच्या सामन्यासाठी खेळाडूंना प्रतिदीन 35000 रुपये दिले जातात.

अजिंक्य रहाणेकडून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचं कौतुक; म्हणाला...

टॅग्स :कपिल देवबीसीसीआयविराट कोहली