Join us  

भारताच्या शिरपेचात मानाचं पान! माजी क्रिकेटपटू विनू मांकड यांना ICCच्या Hall Of Fame स्थान

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC)जाहीर केलेल्या या वर्षीच्या स्पेशल एडिशन 'हॉल ऑफ फेम' सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या १० दिग्गज खेळाडूंमध्ये भारताचे माजी फिरकीपटू विनू मांकड यांचा समावेश केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 7:59 PM

Open in App

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC)जाहीर केलेल्या या वर्षीच्या स्पेशल एडिशन 'हॉल ऑफ फेम' सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या १० दिग्गज खेळाडूंमध्ये भारताचे माजी फिरकीपटू विनू मांकड यांचा समावेश केला आहे. भारतीय क्रिकेटसाठी मोलाचं योगदान दिल्याबद्दल आयसीसीनं विनू मांकड यांचा सन्मान केला आहे. (Vinoo Mankad named in ICC's 10-players Hall of fame list ahead of WTC final)

कसोटी क्रिकेटच्या इतिहासाचा सन्मान करण्यासाठी आयसीसीनं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याआधी आयसीसी 'हॉल ऑफ फेम' क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अमूल्य योगदान दिलेल्या माजी खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे. 

आयसीसीकडून अधिकृत पत्रक जारी करण्यात आलं असून कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जावीत अशी १० खेळाडूंची नावं जाहीर करताना अतिशय आनंद आणि अभिमान वाटत असल्याचं म्हटलं आहे. हॉल ऑफ फेम यादीत आणखी १० नावं समाविष्ट झाली असून हा सन्मान मिळालेल्या एकूण खेळाडूंची संख्या आता १०३ इतकी झाली आहे. 

'आयसीसी'च्या 'हॉल ऑफ फेम'मध्ये समाविष्ट झालेली नवी नावं कोणती?

१. ऑब्रे फॉल्कनर (द.आफ्रिका)२. मॉन्टी नोबल (ऑस्ट्रेलिया)३. सर लरी कॉन्स्टँटाईन (वेस्ट इंडिज)४. स्टॅन मॅककेब (ऑस्ट्रेलिया)५. टेड डेकस्टर (इंग्लंड)६. विनू मांकड (भारत)७. डेसमॉन्ड हेस (वेस्ट इंडिज)८. बॉब विलिस (इंग्लंड)९. अँडी फ्लॉवर (झिम्बाब्वे)१०. कुमार संगकारा (श्रीलंका)

टॅग्स :आयसीसीकुमार संगकाराबीसीसीआय