मुंबई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील चौथी वन डे लढत मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने घंटा वाजवून सामना सुरू करण्यात आला. यावेळी त्याच्यासह अर्जुन तेंडुलकरही होता. बीसीसीआयने सचिनचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला. सचिनचा जीवलग मित्र विनोद कांबळीने तो व्हिडीओ रिट्वीट करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
कांबळीने आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेतील सचिनसोबतच्या खेळीची आठवण करून दिली. हॅरिश शिल्ड आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात सचिनने 348 धावांची खेळी केली होती. कांबळीने सांगितले की आज ज्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर सचिनने घंटा वाजवली त्याच मैदानावर त्याने हॅरिश शिल्ड स्पर्धेत 348 धावांची खेळी केली होती.