Join us

मोहम्मद शामीच्या गावी जाऊन गुन्हे शाखेची कसून चौकशी

सहसपूर, हे शामीचे गाव आहे. गुन्हे शाखेने शामीचे काका सुल्तान अहमद आणि आत्या खुर्शिद अहमद यांना घेऊन सहसपूरला गेली. तिथे त्यांनी शामीचा भाऊ असर अहमदची चौकशी केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 13:51 IST

Open in App
ठळक मुद्देहसीनचा स्वभाव कसा होता आणि ती लोकांबरोबर कशी वागत होती, याबाबतही गुन्हे शाखेने यावेळी चौकशी केली. 

कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी आणि त्याच्या कुटुंबियांची गुन्हे अन्वेषण शाखेने आज त्याच्या गावी जाऊन कसून चौकशी केली. त्याचबरोबर शामीवर गंभीर आरोप लावणाऱ्या हसीन जहाँबाबतही त्यांनी बऱ्याच लोकांकडे चौकशी केली. हसीनचा स्वभाव कसा होता आणि ती लोकांबरोबर कशी वागत होती, याबाबतही गुन्हे शाखेने यावेळी चौकशी केली. 

सहसपूर, हे शामीचे गाव आहे. गुन्हे शाखेने शामीचे काका सुल्तान अहमद आणि आत्या खुर्शिद अहमद यांना घेऊन सहसपूरला गेली. तिथे त्यांनी शामीचा भाऊ असर अहमदची चौकशी केली. त्याचबरोबर शामीच्या आजू-बाजूला राहणाऱ्या स्त्रीयांकडूनही काही माहिती घेतली. या स्त्रीयांशी जवळपास एक तास त्यांनी चौकशी केली, यावेळी हसीनचा तुमच्याबोबर कसा व्यवहार होता? असे काही प्रश्न विचारले. हसीन एक व्यक्ती म्हणून नेमकी कशी आहे, हे जाणून घेण्याचा यावेळी गुन्हे शाखेने प्रयत्न केला.

शामीची पत्नी हसीन जहाँ हिने शमीचे फेसबुक मेसेंजर आणि व्हॉट्सअॅपवरील चॅटिंगचे स्क्रीनशॉट शेअर करून त्याच्यावर हे आरोप केले आहेत.  दरम्यान या प्रकारामुळे शामीचे वैवाहिक जीवन धोक्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये सोशल मीडियावर शामीचे काही तरुणींसोबतचे फोटो  पोस्ट करण्यात आले आहेत. त्या तरुणी शामीच्या गर्लफ्रेंड असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच त्यांच्यासोबतच्या अश्लील चॅटिंगचे स्क्रीनशॉटही शेअर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानमधील प्रेयसीकडून शामी पैसे घेतो आणि देशाला धोका देत आहे, असेही हसीनने सांगितले होते.

टॅग्स :मोहम्मद शामी