Join us
Daily Top 2Weekly Top 5

Vijay Hazare Trophy 2nd Semi Final: प्रभसिमरनचं शतक हुकलं, अनमोलप्रीतनं गाठला ५०० धावांचा पल्ला अन्...

 दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी दीडशतकी भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत नेले. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 18:11 IST

Open in App

Vijay Hazare Trophy Saurashtra vs Punjab 2nd Semi Final : विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये पंजाब आणि सौराष्ट्र या दोन संघातील लढत बंगळुरुस्थित बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलेन्सच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाब संघाचा कर्णधार प्रभसिमरन सिंग आणि अनमोलप्रीत सिंग यांचा शो पाहायला मिळाला.  दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी दीडशतकी भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत नेले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

पंजाबच्या संघाची दमदार सुरुवात, पण ...

सौराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर प्रभसिमरन सिंग याने हरनूर सिंगच्या साथीनं पंजाबच्या डावाची अगदी दमदार सुरुवात केली. या जोडीनं अर्धशतक झळकात सौराष्ट्र संघाच्या गोलंदाजांचे खांदे पाडले. पण दोघांच्यातीलताळमेळ ढासळला अन् हरनूर सिंग ३३ धावांवर धावबाद झाला. पंजाबच्या धावफलकावर ६२ धावा असताना संघाने आपली पहिली विकेट गमावली.

Vijay Hazare Trophy : विदर्भ संघाचा 'बाहुबली'! अमन मोखाडेनं केली विश्वविक्रमाची बरोबरी

प्रभसिमरन सिंग शतक हुकलं, अनमोलप्रित सिंगनं हा डाव साधत ५०० धावांचा पल्लाही गाठला

पहिली विकेट गमावल्यावर कर्णधारानं अमनमोलप्रीत सिंगच्या साथीनं दमदार भागीदारी रचली. दोघांनी दुसऱ्या विकेटासाठी ११५ चेंडूत १०९ धावांची भागीदारी केली.  प्रभसिमरन सिंगचं शतक अवघ्या १३ धावांनी हुकलं.  त्याने ८९ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८७ धावांची खेळी साकारली.  तो बादझाल्यावर अनमोलप्रीत सिंगनं शतकाला गवसणी घातली अन् यंदाच्या हंगामात ५०० धावांचा पल्लाही गाठला.  

अखेरच्या षटकात रमणदीपचा सिंगचा जलवा

शतकी खेळीनंतर अनमोलप्रीत सिंगने विकेट गमावल्यावर त्याची जागाघेण्यासाठी आलेला नमन धीर आणि नेहल वढेरा स्वस्तात माघारी फिरले. त्यानंतर रमनदीनं ३८ चेंडूत ४२ धावांची खेळी करत पंजाबच्या संघाने निर्धारित ५० षटकात सर्वबाद २९१ धावां करत सौराष्ट्र संघासमोर २९२ धावांचे टार्गेट सेट केले  आहे. कर्नाटकच्या संघाने यंदाची फायनलचं तिकीट पक्के केले असून या सामन्यात दुसरा फायनलिस्ट मिळणार आहे. पंजाब धावांचा बचाव करत फायनलमध्ये एन्ट्री मारणार की, धावांचा यशस्वी पाठलाग करत सौराष्ट्र संघ आगेकूच करणार ते पाहण्याजोगे असेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Vijay Hazare Trophy: Prabhsimran falls short, Anmolpreet shines for Punjab.

Web Summary : In the Vijay Hazare Trophy semi-final, Punjab's Prabhsimran missed a century, while Anmolpreet reached 500 runs. Punjab scored 291, setting a 292 target for Saurashtra.
टॅग्स :विजय हजारे करंडकबीसीसीआय