Vijay Hazare Trophy Why Virat Kohli and Rohit Sharma’s Match Was Not Telecast Live Streaming Or Telecast : देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील साखळी फेरीत दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह अनेक स्टार खेळाडू मैदानात उतरणार आहेत. पण पहिल्या सामन्याप्रमाणे विराट-रोहितचा दुसरा सामनाही क्रिकेट चाहत्यांना Live पाहता येणार नाही. या स्पर्धेतील फक्त दोन सामने Live Streaming साठी उपलब्ध आहेत. इथं जाणून घेऊयात कोणते सामने लाईव्ह पाहता येतील आणि रोहित आणि विराटचा सामना Live दाखवण्यात काय अडचण आहे त्यासंदर्भातील माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पुन्हा तेच! रोहित-विराट मैदानात उतरले, चाहत्यांच्या पदरी निराशा, कारण..
विराट कोहली विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत दिल्लीच्या संघाचे प्रतिनिधीत्व करत आहे. दिल्लीचा संघ बंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्स येथे गुजरात विरुद्ध भिडणार आहे. दुसऱ्या बाजूला रोहित शर्मा जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियममध्ये मुंबईकडून उत्तराखंड विरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसेल. दोघांनी पहिल्या सामन्यात शतकी खेळीसह मैफिल लुटली होती. ते पुन्हा एकदा धमाका करण्यास सज्ज असले तरी ज्या मैदानात ते दुसरा सामना खेळणार आहेत तिथे लाइव्ह सेटअप उपलब्ध नाही. त्यामुळे दोघांच्या फलंदाजीचा आनंद चाहत्यांना Live स्ट्रिमिंग किंवा टेलिव्हिजनच्या माध्यमातून घेता येणार नाही.
Vijay Hazare Trophy सामन्यादरम्यान रोहित शर्माला चक्क वडापावची ऑफर; त्यावर हिटमॅनची मजेशीर रिअॅक्शन (VIDEO)
१९ पैकी फक्त दोन सामने Live Streaming
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत शुक्रवारी होणाऱ्या १९ सामन्यांपैकी फक्त ग्रुप बीमधील आसाम विरुद्ध जम्मू आणि काश्मीर आणि ग्रुप एमधील झारखंड विरुद्ध राजस्थान हे दोनच सामने जिओहॉटस्टारवर लाईव्ह प्रक्षेपित केले जातील. या स्पर्धेत राजकोटच्या निरंजन शाह आणि अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच लाईव्ह सामन्याचे सेटअप आहे. त्यामुळेच फक्त मोजके दोन सामने क्रिकेट चाहत्यांना लाईव्ह पाहता येतील.
विजय हजारे ट्रॉफी – Elite Group चे आजचे सामने
- गोवा vs हिमाचल प्रदेश, मैदान: जयपूरिया विद्यालय मैदान, जयपूर
- मुंबई vs उत्तराखं मैदान: सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर
- छत्तीसगड vs पंजाब, मैदान: अनंतम ग्राउंड, जयपूर
- सिक्कीम vs महाराष्ट्र, मैदान: के.एल. सैनी ग्राउंड, जयपूर
- सौराष्ट्र vs हरियाणा, मैदान: KSCA क्रिकेट ग्राउंड (2), अलूर
- रेल्वे vs आंध्र, मैदान: KSCA क्रिकेट ग्राउंड, अलूर
- सर्व्हिसेस vs ओडिशा, मैदान: KSCA क्रिकेट ग्राउंड (3), अलूर
- दिल्ली vs गुजरात, मैदान: BCCI सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राउंड 1, बेंगळुरू
- उत्तर प्रदेश vs चंदीगड, मैदान: सनोसारा क्रिकेट ग्राउंड A, राजकोट
- जम्मू-काश्मीर vs आसाम, मैदान: निरंजन शाह स्टेडियम, खांडेरी
- बंगाल vs बडोदा, मैदान: निरंजन शाह स्टेडियम C, राजकोट
- विदर्भ vs हैदराबाद,मैदान: सनोसारा क्रिकेट ग्राउंड B, राजकोट
- तामिळनाडू vs मध्य प्रदेश, मैदान: गुजरात कॉलेज ग्राउंड
- झारखंड vs राजस्थान, मैदान: नरेंद्र मोदी स्टेडियम
- पुडुचेरी vs त्रिपुरा, मैदान: ADSA रेल्वे क्रिकेट ग्राउंड
- केरळ vs कर्नाटक, मैदान: नरेंद्र मोदी स्टेडियम बी ग्राउंड
विजय हजारे ट्रॉफी – प्लेट गट सामने (रांची)
- बिहार vs मणिपूर मैदान: JSCA इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्स, रांची
- अरुणाचल प्रदेश vs मिझोराम, मैदान: JSCA ओव्हल ग्राउंड, रांची
- मेघालय vs नागालँड, मैदान: उषा मार्टिन ग्राउंड, रांची