Vijay Hazare Trophy 2025 Vaibhav Suryavanshi New Record With Century : बिहारचा १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्याच दिवशी मोठा धमाका करत विक्रमी सेंच्युरी झळकावली आहे. एका बाजूला या स्पर्धेत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या दिग्गजांच्या पुनरागमनाची चर्चा रंगत असताना बिहारच्या संघाकडून मैदानात उतरलेल्या युवा प्रतिभावान फलंदाजाने अरुणाचल प्रदेशविरुद्ध फक्त ३६ चेंडूंत शतक झळकावले. या खेळीसह वैभव सूर्यवंशी १४ वर्षे २७२ वर्ष एवढ्या वयात लिस्ट-ए क्रिकेटच्या इतिहासात शतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. याशिवाय, लिस्ट-ए क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूकडून झळकावण्यात आलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात जलद शतकाची नोंदही त्याच्या नावावर झाली आहे. या यादीत तो पंजाबच्या अनमोलप्रीत सिंगच्या मागे आहे. २०२४ मध्ये अनमोलप्रीत सिंगनं अरुणाचल प्रदेशविरुद्ध अवघ्या ३५ चेंडूत शतक झळकावले होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
द्विशतक थोडक्यात हुकलं
बिहार आणि अरुणचल प्रदेश यांच्यातील सामना रांची येथील JSCA ओव्हल ग्राउंडवर खेळवण्यात आला. या सामन्यात बिहारच्या डावाची सुरुवात करताना वैभव सूर्यवंशी याने ८४ चेंडूत २२६.१९ च्या स्ट्राइक रेटसह १९० धावांची खेळी केली. त्याचे द्विशतक अवघ्या १० धावांनी हुकले.
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
वैभव सूर्यवंशीची कमाल शतकी कामगिरीचा असाही एक खास रेकॉर्ड
वैभव सूर्यवंशी हा सध्याच्या घडीला क्रिकेट जगतातील सर्वात लक्षवेधी चेहरा ठरताना दिसतोय. त्याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेसह सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, आयपीएल, युथ वनडे, युथ टेस्ट, तसेच इंडिया A कडून खेळताना शतके झळकावण्याचा खास रेकॉर्डही आपल्या नावे केला आहे. नुकत्याच झालेल्या अंडर-१९ आशिया कप २०२५ स्पर्धेत त्याने ९५ चेंडूंत १७१ धावांची ऐतिहासिक खेळी साकारली होती.
लिस्ट-ए क्रिकेटमधील सर्वात जलद शतके
- जेक फ्रेझर-मॅकगर्क २९ चेंडूत शतक, दक्षिण आफ्रिका विरुद्ध तास्मानिया अॅडलेड (२०२३-२४)
- एबी डी व्हिलियर्स ३१ चेंडूत शतक, दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडीज जोहान्सबर्ग २०१४-१५
- अनमोलप्रीत सिंग ३५ चेंडूत शतक, पंजाब विरुद्ध अरुणाचल प्रदेश, अहमदाबाद २०२४-२५
- कोरी अँडरसन ३६ चेंडूत शतक, न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडीज, क्विन्सटाउन २०१४
- ग्रॅहम रोज ३६ चेंडूत शतक समरसेट विरुद्ध डेव्हन टॉर्क्वे (१९९०)
- वैभव सूर्यवंशी ३६ चेंडूत बिहार विरुद्ध अरुणाचल प्रदेश, रांची (२०२५)
Web Summary : Bihar's 14-year-old Vaibhav Suryavanshi stunned with a record-breaking century in his Vijay Hazare Trophy debut against Arunachal Pradesh. He scored a century in just 36 balls. He's now the youngest to score a List-A century and second-fastest Indian to achieve this milestone.
Web Summary : बिहार के 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी ने विजय हजारे ट्रॉफी के पहले ही मैच में अरुणाचल प्रदेश के खिलाफ रिकॉर्ड तोड़ शतक बनाया। उन्होंने सिर्फ 36 गेंदों में शतक जड़ा। वह लिस्ट-ए क्रिकेट में शतक बनाने वाले सबसे युवा खिलाड़ी बन गए हैं और ऐसा करने वाले दूसरे सबसे तेज भारतीय हैं।