Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL लिलावात अनसोल्ड राहिला! 'त्या' गोलंदाजानं Vijay Hazare Trophy स्पर्धेत हॅटट्रिकसह रचला इतिहास

IPL २०२६ च्या मिनी लिलावात लागला होता अनसोल्डचा टॅग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 17:16 IST

Open in App

Vijay Hazare Trophy Rajesh Mohanty Becomes First Ever Odisha Bowler To Pick A Hat Trick :ओडिशाचा वेगवान गोलंदाज राजेश मोहिती याने बंगळुरू येथील अलूर क्रिकेट स्टेडियम (ग्राउंड क्रमांक ३) रंगलेल्या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली आहे. सर्व्हिसेसविरुद्धच्या एलिट फेरीतील सामन्यात त्याने हॅट्ट्रिकचा डाव साधला. आपल्या ३९ व्या लिस्ट-ए सामन्यात त्याने ही ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

 हॅटट्रिकसह नावे झाला खास रेकॉर्ड

नाणेफेक जिंकल्यावर ओडिशा संघाने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.सातव्या षटकात राजेश मोहिती याने  सलामीवीर सागर दहिया याला बाद केले. त्यानंतर सलग दोन चेंडूंवर अमित शुक्ला आणि रवी चौहान यांना पायचित (LBW) करत त्याने हॅटट्रिकपूर्ण केली. लिस्ट ए क्रिकेटमध्ये ओडिशा संघाकडून हॅटट्रिक नोंदवणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे.  या सामन्यात त्याने ९ षटकात २५ धावा खर्च करताना ४ विकेट्स घेतल्या. त्याच्या भेदक माऱ्याच्या जोरावर सर्विसेसच्या संघाचा डाव अवघ्या ८३ धावांत आटोपला. ओडिशा संघाने ४ विकेट्स राखून हा सामना खिशात घातला.

रोहित शर्मासह सलामीला येणारा अंगक्रिश रघुवंशी गंभीर जखमी; रुग्णालयात दाखल; काय घडलं?

IPL २०२६ च्या मिनी लिलावात अनसोल्डचा टॅग

राजेश मोहिती हा आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावात अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूंपैकी एक आहे. अबूधाबी येथे पार पडलेल्या IPL लिलावात या खेळाडूनं ३० लाख या मूळ किंमतीसह नाव नोंदणी केली होती. पण त्याला कोणत्याच फ्रँचायझी संघाने खरेदी केले नाही. आतापर्यंत त्याने ३८ लिस्ट-ए सामन्यांत ४१ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच ३४ प्रथम श्रेणी सामन्यांत १२४ विकेट्स त्याच्या नावावर आहेत. टी-२० क्रिकेटमध्येही त्याची कामगिरी उल्लेखनीय असून, २८ डावांत त्याच्या खात्यात २७ विकेट्स जमा आहेत.  

English
हिंदी सारांश
Web Title : Unsold IPL Player Creates History with Hat-trick in Vijay Hazare!

Web Summary : Rajesh Mohanty, unsold in IPL auction, made history in Vijay Hazare Trophy. He became the first Odisha bowler to achieve a hat-trick in a List A match against Services, taking 4 wickets. Odisha won by 4 wickets after dismissing Services for 83.
टॅग्स :विजय हजारे करंडकबीसीसीआयआयपीएल २०२४