Vijay Hazare Trophy Rohit Sharma Sawai Mansingh Stadium Jaipur Watch Video : भारताचा माजी कर्णधार आणि हिटमॅन रोहित शर्मा देशांतर्गत क्रिकेटमधील विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील सामन्यात मुंबईच्या संघाकडून मैदानात उतरला आहे. ७ वर्षांनी तो या स्पर्धेत खेळताना दिसत आहे. मुंबई आणि सिक्कीम यांच्यातील विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील सामना जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. रोहित मैदानात उतरल्यामुळे गुलाबी शहरात रंगलेल्या सामन्यात चाहत्यांची कमालीची उत्सुकता पाहायला मिळाली. रोहितची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. स्टेडियमवर जेवढे लोक दिसत होते तेवढेच लोक स्टेडियम बाहेरही दिसत होते. सोशल मीडियावर जयपूरमधील चाहत्यांमधील रोहित शर्माबद्दलची क्रेझ दाखवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
जयपूरच्या स्टेडियमवर तुफान गर्दी अन् रोहित रोहित घोषणाबाजी
रोहितच्या उपस्थितीमुळे देशांतर्गत क्रिकेटमधील सामन्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं स्वरुप आल्याचे पाहायला मिळाले. मुंबई विरुद्ध सिक्कीम यांच्यातील सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. टेलिव्हिजन आणि Live स्ट्रिमिंगवर हा सामना उपलब्ध नाही. पण मैदानात एक खास माहोल पाहायला मिळाला. स्टेडियमवर चाहते रोहित रोहित...अशी घोषणाबाजी करताना दिसले. हिटमॅन रोहितनं क्षेत्रक्षण करतावेळी चाहत्यांना हातवारे करत त्यांच्या मनातील भावना जपल्याचेही पाहायला मिळाले.
७ वर्षांनी देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उतरला आहे रोहित
रोहित शर्माने कसोटी आणि आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर तो आता फक्त वनडेत सक्रीय आहे. २०२७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी ७ वर्षांनी रोहित विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेआधी त्याच्यासाठी या स्पर्धेतील सामने महत्त्वपूर्ण ठरतील. आतापर्यंत विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत रोहितनं १८ सामन्यात ३८.७ च्या सरासरीसह १ शतक आणि ३ अर्धसतकाच्या मदतीने ५८१ धावा केल्या आहेत. सध्याच्या घडीला तो जबरदस्त फॉर्ममध्ये असून या स्पर्धेतही त्याचा मोठा धमाका पाहायला मिळू शकतो.
Web Summary : Rohit Sharma's return to the Vijay Hazare Trophy after seven years sparked massive excitement in Jaipur. Fans flocked to the stadium, chanting his name as he played for Mumbai against Sikkim. The atmosphere resembled an international match, highlighting Sharma's popularity.
Web Summary : रोहित शर्मा की सात साल बाद विजय हजारे ट्रॉफी में वापसी से जयपुर में भारी उत्साह देखने को मिला। मुंबई और सिक्किम के मैच में प्रशंसक स्टेडियम में उमड़ पड़े और उनका नाम जप रहे थे। वातावरण अंतरराष्ट्रीय मैच जैसा था, जो शर्मा की लोकप्रियता को दर्शाता है।