Captain Sakibul Gani Faster Century Than Vaibhav Suryavanshi Bihar Scores Highest Total Word Record विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेत वैभव सूर्यवंशी १९० (८४), आयुष लोहारुका ११६ (५६) आणि कर्णधार साकिबुल गनी १२८ (४०) शतकाच्या जोरावर बिहारच्या संघाने विश्वविक्रमी धावसंख्या उभारली आहे. अरुणाचल प्रदेशविरुद्ध रांचीच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात बिहारनं पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात ५७४ धावा केल्या. लिस्ट-ए क्रिकेटमधील ही सर्वात मोठी संघधावसंख्या आहे. याआधी हा वर्ल्ड रेकॉर्ड तमिळनाडूच्या संघाच्या नावे होता. २०२२ च्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत तामिळनाडूच्या संघाने अरुणाचल प्रदेशविरुद्ध २ विकेट्सच्या मोबदल्यात ५०६ धावा केल्या होत्या. हा विक्रम आता बिहारच्या संघाने मोडीत काढला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वैभव सूर्यवंशीच द्विशतक अवघ्या १० धावांनी हुकलं; आयुष-साकिबुल गनीनंही धु धु धुतलं
बिहारच्या डावाची सुरुवात करताना वैभव सूर्यवंशी याने ८४ चेंडूत २०० पेक्षा अधिकच्या स्ट्राइकरेटसह १९० धावांची धमाकेदार आणि विक्रमी खेळी साकारली. तो लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक झळकवणारा खेळाडू ठरला. द्विशतकाच्या उंबरठ्यावर तो माघारी परतल्यावर आयुष लोहारुका आणि कर्णधार कर्णधार साकिबुल गनी ही जोडी जमली. आयुषनं ५६ चेंजूत ११ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने ११६ धावांची खेळी केली.
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
बिहारच्या कर्णधारानं वैभव सूर्यवंशीपेक्षा जलदगतीने साजरी केली सेंच्युरी
कर्णधार साकिबुल याने तर ३२० च्या स्ट्राइक रेटनं ४० चेंडूत १० चौकार आणि १२ षटकारांच्या मदतीने नाबाद १२८ धावा कुटल्या. बिहारचा कर्णधाराने ३२ चेंडूत शतक झळकावले. लिस्ट ए क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जलद शतकी खेळीचा रेकॉर्ड आता त्याच्या नावे झाला आहे. याशिवाय पियुष सिंहनं ६६ चेंडूतील ७७ धावाांच्या खेळीसह संघाच्या धावफकावर विश्वविक्रमी धावसंख्याउभारण्यात मोलाचा वाटा उचलला.३०० पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटनं धावा करताना
लिस्ट-ए क्रिकेटमधील सर्वाधिक संघधावसंख्या
बिहार-५७४/६ विरुद्ध अरुणाचल प्रदेश (२०२५)
तामिळनाडू - ५०६/२ विरुद्ध अरुणाचल प्रदेश (२०२२)
इंग्लंड - ४९८/४ विरुद्ध नेदरलँड्स (२०२२)
सरे- ४९६/४ विरुद्ध ग्लॉस्टरशायर (२००७)
इंग्लंड - ४८१/६ विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२०१८)