तुफानी फलंदाजी! तामिळनाडूच्या संघाने वनडेत ठोकल्या ५०० धावा, रचला आतापर्यंतचा सर्वात मोठा विश्वविक्रम

Vijay Hazare Trophy 2022: तामिळनाडूच्या संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० षटकांमध्ये २ बाद ५०६ धावा ठोकून एका मोठ्या विश्वविक्रमाची नोंद केली आहे. लिस्ट ए एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५०० धावांचा टप्पा ओलांडणारा तामिळनाडू हा जगातील पहिला संघ ठरला आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 03:28 PM2022-11-21T15:28:08+5:302022-11-21T15:32:57+5:30

whatsapp join usJoin us
Vijay Hazare Trophy 2022: Tamil Nadu scored 500 runs in ODIs, the highest ever world record | तुफानी फलंदाजी! तामिळनाडूच्या संघाने वनडेत ठोकल्या ५०० धावा, रचला आतापर्यंतचा सर्वात मोठा विश्वविक्रम

तुफानी फलंदाजी! तामिळनाडूच्या संघाने वनडेत ठोकल्या ५०० धावा, रचला आतापर्यंतचा सर्वात मोठा विश्वविक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई - तामिळनाडूच्या संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० षटकांमध्ये २ बाद ५०६ धावा ठोकून एका मोठ्या विश्वविक्रमाची नोंद केली आहे. विजय हजारे करंडक स्पर्धेमध्ये अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या लढतीत नारायण जगदिशन (२७७) आणि साई सुदर्शन (१५४) यांनी केलेल्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर तामिळनाडूने पाचशेपार मजल मारली. लिस्ट ए एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५०० धावांचा टप्पा ओलांडणारा तामिळनाडू हा जगातील पहिला संघ ठरला आहे.  

या विक्रमाबरोबरच तामिळनाडूने एकदिवसीय क्रिकेटमधील इंग्लंडचा विश्वविक्रम मोडित काढला आहे. इंग्लंडच्या संघाने याचवर्षी जून महिन्यात नेदरलँड्सविरोधात ५० षटकांत ४९८ धावा कुटल्या होत्या. तामिळनाडूने आज ५०६ धावा फटकावल्याने इंग्लंडच्या संघाचा विक्रम मोडित निघाला.

तामिळनाडूच्या संघाने प्रथम फलंदाजीस सुरुवात केल्यावर सलामीवीर साई सुदर्शन १०२ चेंडूत १५४ धावा आणि नारायण जगदिशन १४१ चेंडूत २७७ धावा यांनी तुफानी खेळी केली. या दोघांनीही ४१६ धावांची विक्रमी भागीदारी केली. २७७ धावांची खेळी करणाऱ्या जगदिशनने अरुणाचल प्रदेशच्या गोलंदाजांची धुलाई करताना २५ चौकार आणि १५ षटकार ठोकले.  

५० षटकांत सर्वात मोठ्या धावसंख्या
१ - तामिळनाडी २ बाद ५०६
२ - इंग्लंड ६ बाद ४९८
३ - सरे ४ बाद ४९६
४ - इंग्लंड ४ बाद ४८१
५ - भारत अ ४ बाद ४५८ 

 

Web Title: Vijay Hazare Trophy 2022: Tamil Nadu scored 500 runs in ODIs, the highest ever world record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.