Join us
Daily Top 2Weekly Top 5

#VienderSehwag: इशांत शर्माने दिल्या शुभेच्छा अन् वीरूचा गमतीशीर रिप्लाय

#VienderSehwag: भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आज 40 वा वाढदिवस साजरा करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 15:22 IST

Open in App

मुंबईः भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आज 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. स्फोटक फलंदाज म्हणून नावाजलेला सेहवाग निवृत्तीनंतर सोशल मीडियावरील गमतीशीर विधानांसाठी प्रसिद्ध आहे.  दिल्लीच्या या माजी फलंदाजावर क्रिकेट वर्तुळातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सेहवागही प्रत्येकाचे आभार मानत आहे, परंतु माजी सहकारी इशांत शर्माच्या शुभेच्छावर त्याने दिलेला गमतीशीर रिप्लाय सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 ''वीरु भाई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजार...'' अशा इशांतने ट्विटरवर पोस्ट केली. त्यावर सेहवागने रिप्लाय दिला. सेहवाग म्हणाला,''धन्यवाद बुर्ज खलिफा जी..'' भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनसह अनेकांनी सेहवागला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

टॅग्स :विरेंद्र सेहवागइशांत शर्मा