Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video : युझवेंद्र चहलचा Tik Tok व्हिडीओ व्हायरल, दोन मुलींसोबत केला डान्स

भारतीय संघातील सध्याच्या घडीचा आघाडीचा फिरकीपटू युजवेंद्र चहल सध्या सुट्टीवर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 09:37 IST

Open in App

भारतीय संघातील सध्याच्या घडीचा आघाडीचा फिरकीपटू युजवेंद्र चहल सध्या सुट्टीवर आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर टीम इंडिया कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. पण, चहलचा कसोटी संघात सहभाग नाही आणि त्यामुळे त्याच्याकडे बराच फावला वेळ आहे. त्याचा तो टिक टॉक व्हिडीओ तयार करण्यात सदुपयोग करत आहे. चहलचा एक नवा टिक टॉक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. त्यात तो दोन मुलींसोबत डान्स करताना तुम्हाला पाहायला मिळेल.

चहलच्या या व्हिडीओला आतापर्यंत 5 लाखांहून अधिक व्ह्यूवर्स मिळाले आहेत. चहलनं न्यूझीलंड दौऱ्यात पाच ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं. पण, त्याला केवळ तीनच विकेट्स घेता आल्या. तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत त्यानं सहा विकेट्स घेतल्या. पण, टीम इंडियाला वन डे मालिका गमवावी लागली. कसोटी मालिकेत चहलचा समावेश नाही आणि आता तो मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या वन डे मालिकेतून पुन्हा कमबॅक करेल.

पाहा व्हिडीओ.. 

टॅग्स :युजवेंद्र चहलटिक-टॉक