Join us  

Video : दहा दिवसांचा पंतप्रधान बनवल्यास काय करशील? शाहिद आफ्रिदीनं सांगितली दोन टार्गेट!

आफ्रिदीची आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 4:54 PM

Open in App

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी त्याच्या बेताल वक्तव्यामुळे टीकेचा धनी बनला आहे. पाकव्याप्त काश्मीर खोऱ्यात शाहिद आफ्रिदी त्याच्या फाऊंडेशनच्या समाजकार्यानिमित्त गेला होता. त्यावेळी त्यानं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपमानास्पद विधान केलं होतं. शिवाय त्यानं काश्मीर मुद्द्यावरूनही टिप्पणी केली होती. त्यानंतर नेटिझन्सनी आफ्रिदीचा चांगलाच समाचार घेतला. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर, माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगसह फिरकीपटू हरभजन सिंग, अष्टपैलू सुरेश रैना आणि सलामीवीर शिखर धवन यांनी त्याच्यावर जोरदार टीका केली होती. आफ्रिदीची आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

शाहिद आफ्रिदी म्हणतो... त्याच्या बायोपिकमध्ये हॉलिवूड-बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्यांनी मूख्य भूमिका करावी

आफ्रिदी काय म्हणाला होता?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणारा आफ्रिदी नक्की काय म्हणाला होता?  या व्हिडीओत तो म्हणाला होता की, कोरोनापेक्षा मोठा रोग मोदी यांच्या मनात आणि डोक्यात आहे. तो आजार धर्माचा आहे. त्या आजारावर ते सत्ता चालवत आहेत. आमच्या काश्मिरी लोकांवर अत्याचार करत आहे याचे उत्तर त्यांना द्यावचं लागेल.

यानंतर आफ्रिदीने काश्मीरवरुन संताप व्यक्त केला. ''नरेंद्र मोदी सर्वात डरपोक माणूस आहे. मोदींनी काश्मीरमध्ये भारताचे सात लाख सैनिक तैनात केले आहेत. इतके सैनिक आमच्या संपूर्ण पाकिस्तानच्या सैन्यात आहेत. परंतु त्यांना हे माहित नाही की त्या ७ लाख सैनिकांच्या मागे आणखी २२-२३ कोटी सैन्य आहे आणि आम्ही आमच्या पाकिस्तानी सैन्यासोबत आहोत,'' असं शाहीद आफ्रिदी म्हणाला. 

भीक मागून जगणाऱ्या तुझ्या देशासाठी काहीतरी कर; सुरेश रैनानं आफ्रिदीला जागा दाखवली 

22 कोटींना घेऊन आलास, तरी काश्मीर आमचाच होता अन् राहणार; 'गब्बर'नं आफ्रिदीला खडसावलं 

मर्यादा ओलांडू नकोस, अन्यथा तुझी लायकी दाखवून देईन; आफ्रिदीच्या विधानानंतर हरभजन सिंग भडकला

नव्या व्हिडीओत आफ्रिदी काय म्हणतोय?या व्हिडीओत आफ्रिदीला एक प्रश्न विचारण्यात आला. दहा दिवसांसाठी पंतप्रधान बनवल्यास काय करशील? त्यावर आफ्रिदी म्हणाला,''माझे दोन टार्गेट आहेत.. एक देशातील बेरोजगारी आणि दुसरा शिक्षण. या दोन गोष्टींवर काम करेन. 

पाहा व्हिडीओ...

अन्य महत्त्वाच्या बातम्या

हरभजन सिंग मागतोय सचिन तेंडुलकरकडे लिंबू, Video पाहून तुम्हालाही कळेल कारण

Shocking : WWE सुपरस्टारचा बुडून दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवण्यासाठी केला त्याग!

वाईट बातमी; अजिंक्य रहाणेच्या मामांचा विहिरीत पडून मृत्यू

Video : मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँच्या 'उमराव जान' लूकनं नेटिझन्सना केलं घायाळ 

इंडियन प्रीमिअर लीगच्या फॅन्ससाठी Good News!

सचिन तेंडुलकर इनस्विंग चेंडूवर चाचपडायचा; पाकिस्तानच्या दिग्गज गोलंदाजाचा दावा

 

टॅग्स :शाहिद अफ्रिदीपाकिस्तान