शाहिद आफ्रिदी म्हणतो... त्याच्या बायोपिकमध्ये हॉलिवूड-बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्यांनी मूख्य भूमिका करावी

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी रविवारपासून टीकेचा सामना करत आहे. त्यानं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा सर्व स्तरावरून निषेध नोंदवला जात आहे.

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर, माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग, फिरकीपटू हरभजन सिंग, शिखर धवन आणि सुरेश रैना यांनी आफ्रिदीचा चांगलाच समाचार घेतला.

शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनच्या कामानिमित्त पाकिस्तानी खेळाडू पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेला होता आणि तेथे तो नको रे बरळला.

आता आफ्रिदीला आणखी एक स्वप्न पडत आहे आणि ते म्हणजे बायोपिकचं...

इतर क्रिकेटपटूंप्रमाणे त्याच्या आयुष्यावरही बायोपिक तयार व्हावा असं त्याला वाटत आहे आणि मुख्य भूमिकेसाठी त्यानं हॉलिवूड व बॉलिवूडमधील अभिनेत्यांचीही निवड केली आहे.

आफ्रिदीला इंग्रंजी आणि ऊर्दू भाषेत हा बायोपिक व्हावा असं वाटत आहे. इंग्रजी बायोपिकमध्ये त्याची भूमिका टॉम क्रुजने करावी, अशी इच्छा त्यानं बोलून दाखवली.

Geo Newsशी बोलताना त्यानं सांगितलं की, बॉलिवूडचा आमीर खान यानं ऊर्दू बायोपिकमध्ये काम करावं असं त्याला स्वप्न पडत आहे.

त्याच्या या स्वप्नांची नेटिझन्सकडून चांगलीच खिल्ली उडवली जात आहे.