Join us  

Video: असं कुठं असतं का भौ! काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा? तुम्हीच ठरवा...

या व्हिडीओमध्ये एक फलंदाज ज्यापद्धतीने आऊट झालेला पाहायला मिळाला, की त्यावर काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा? असा प्रश्न तुम्हाला पडेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 5:02 PM

Open in App

नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये काही वेळेला अशा गोष्टी घडतात, की हसावं की रडावं, हेच कळत नाही. कधी कधी तर सामान्य विचार न करता खेळाडू वागतात आणि अपेक्षेनुरुप फसतात. काही खेळाडू डोळे झाकून आत्मघातही करतात. अशीच एक गोष्ट क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळाली आहे. सध्याच्या घडीला एक व्हिडीओ चांगलाच वायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक फलंदाज ज्यापद्धतीने आऊट झालेला पाहायला मिळाला, की त्यावर काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा? असा प्रश्न तुम्हाला पडेल.

क्रिकेटच्या मैदानात नेमकं घडलं तरी काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर ऐका. फलंदाज एका फिरकीपटूचा सामना करत होता. यावेळी दोन स्लीप, शॉर्ट लेग आणि सिलि पॉइंट अशी फिल्डींग सजवलेली होती. यावेळी फिरकीपटूने चेंडू टाकला. हा चेंडू फलंदाजाने शॉर्ट लेगच्या दिशेने टोलावला. शॉर्ट लेगला उभ्या असलेल्या खेळाडूच्या हातामध्ये चेंडू विसावला. पण फलंदाजाला यावेळी काय वाटले कुणास ठाऊक, तो फलंदाज धाव घेण्यासाठी पळायला लागला. आणि त्यानंतर काय झालं ते व्हिडीओमध्येच पाहा...

ही गोष्ट घडली ती इंग्लंडच्या कौंटी क्रिकेटमध्ये. लिस्टरशायर आणि ग्लॅमॉर्गन या संघांमध्ये हा सामना रंगत होता. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू मार्क कॉसग्रोव्ह हा यावेळी फलंदाजी करत होता. कॉसग्रोव्हला पहिल्या डावात भोपळाही फोडता आला नव्हता. त्यामुळे दुसऱ्या डावात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण दुसऱ्या डावात तो फार वाईट पद्धतीने बाद झाला. ही बाद होण्याची पद्धत फलंदाजासाठी वाईट असली चाहत्यांनी मात्र या गोष्टीचा चांगलाच आनंद लुटला. तुम्हीदेखील व्हिडीओ पाहिल्यावर पोट धरून हसलाच असाल. 

टॅग्स :आॅस्ट्रेलियाइंग्लंड