Join us

Video : विराट कोहलीचा पारा चढला, चाहत्याला म्हणाला देश सोडून जा!

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 18:15 IST

Open in App

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात त्याने एका चाहत्याला चक्क देश सोडण्याचा सल्ला दिला. त्याची ही गोष्ट काहींना आवडली, तर अनेकांनी त्याला ट्रोल केले. कोहलीने नुकताच 30वा वाढदिवस साजरा केला. सध्या त्याला विश्रांती देण्यात आलेली आहे. 

व्हिडीओत कोहली मोबाईलवर काही तरी वाचताना दिसत आहे. भारतीय फलंदाजांच्या तुलनेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा खेळ अधिक आनंददायी असतो, असे एका चाहत्याने लिहिले. त्यावर कोहली म्हणाला,''तुम्ही भारतात राहू नका. तुम्हाला दुसरे देश आवडतात, मग तुम्ही आमच्या देशात का राहता?'' कोहली पुढे म्हणाला,''तुम्हाला मी आवडत नाही... काहीच हरकत नाही. पण, तुम्ही या देशात राहू नका. तुम्ही स्वतःची प्राथमिकता ओळखा.'' कोहलीच्या या उत्तरानंतर त्याच्याविरोधात अन्य नेटिझन्स एकवटले. 

टॅग्स :विराट कोहलीबीसीसीआय