Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video Viral; बाबो! भर पार्टीत विराट-अनुष्काचं लिपलॉक

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा हे दोघं एकत्र आले, तर त्यांची चर्चा झालीच पाहिजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 11:18 IST

Open in App

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा हे दोघं एकत्र आले, तर त्यांची चर्चा झालीच पाहिजे. क्रिकेट आणि बॉलिवूड क्षेत्रातील या दोन सेलेब्रिटींचा चाहतावर्ग फार मोठा आहे. मुंबईत शुक्रवारी रंगलेल्या Indian Sports Honours सोहळ्यातही या जोडीनं हजेरी लावली होती. विराट अन् अनुष्का या दोघांचा हॉट लूक पाहून चाहते घायाळ झाले. या सोहळ्यात विराट आणि अनुष्का यांच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. हा सोहळा फेब्रुवारी महिन्यात होणार होता, परंतु पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळे तो पुढे ढकलण्यात आला. याच सोहळ्यातील विराट व अनुष्काचा लिपलॉप व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या सोहळ्यात 11 विविध क्रीडा स्पर्धांतील भारतीय खेळाडूंना गौरविण्यात आले. पुल्लेला गोपीचंद, अभिनव बिंद्रा, सरदार सिंग, महेश भुपती, पी टी उषा आणि अंजली भागवत या दिग्गज खेळाडूंच्या समितीनं या खेळाडूंची निवड केली. विरुष्का त्यांच्या प्रेम प्रकरणावर सार्वजनिकरित्या कधी बोलत नाही. फार क्वचितच आणि फार कमीच किस्से त्यांचे ऐकीवात आले असावेत. 11 डिसेंबर 2017 मध्ये कोहली आणि अनुष्का लग्नाच्या बंधनात अडकले. याआधीही विरुष्काच्या किसींग व्हिडीओ व्हायरल झाला होता. 

दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने ( DDCA) फिरोज शाह कोटला स्टेडियममधील एका स्टॅण्डला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे नाव देण्यात आहे. या सोहळ्याला विराटसह अनुष्काही उपस्थित होती. पतीचं कौतुक होताचा पाहून तिच्या डोळ्यात पाणी दाटून आले होते. भारतीय संघातील सदस्यही या सोहळ्याला उपस्थित होते. त्यात शिखर धवन, रिषभ पंत, कृणाल पांड्या, लोकेश राहुल, मनिष पांडे, हार्दिक पांड्या यांचा समावेश होता.या सोहळ्यात कोहलीच्या नावाची घोषणा होताच अनुष्का भावुक झाली आणि तिनं त्याचा हात हातात घेतला. सर्वांची नजर चुकवून अनुष्कानं हळुच कोहलीच्या हाताला किस केलं. पण, अनुष्का व कोहलीचा हा रोमँटिक क्षण कॅमेरात कैद झाला आणि सोशल मीडियावर व्हायरलही झाला.  पण, त्यावेळी अनुष्कानं विराटच्या हाताचे चुंबन घेतले होते. पण आता तर या कपलनं हद्दच केली... पाहा व्हायरल व्हिडीओ

टॅग्स :विरूष्काविराट कोहलीअनुष्का शर्मा