Join us  

Video : टीम इंडियाचा '3D' खेळाडू चढला बोहोल्यावर; सनरायझर्स हैदराबादनं दिल्या शुभेच्छा

इंग्लंडमध्ये २०१९मध्ये झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान टीम इंडियाच्या '3D' खेळाडूची चर्चा रंगली होती.

By स्वदेश घाणेकर | Published: January 28, 2021 9:33 AM

Open in App

इंग्लंडमध्ये २०१९मध्ये झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान टीम इंडियाच्या '3D' खेळाडूची चर्चा रंगली होती. अनुभव अंबाती रायुडू याला डावलून निवड समितीनं थ्री डी खेळाडू म्हणून ज्याला संघात घेतले, त्याला फार काही चमक दाखवता आली नाही. त्यामुळे निवड समिती तोंडावर आपटली होती. हा खेळाडू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता तुम्हाला कळलाच असेल हा थ्री डी खेळाडू कोण?

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर ( Vijay Shankar) यानं २७ जानेवारीला वैशाली विश्वेश्ररन ( Vaishali Visweswaran ) हिच्याशी लग्न बंधनात अडकला. इंडियन प्रीमिअर लीगमधील फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) यांनी विजय शंकरचा हा फोटो पोस्ट करून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.  

३० वर्षीय विजय शंकर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाचा सदस्य नव्हता. २०१८मध्ये त्यानं टीम इंडियाकडून ट्वेंटी-20 संघातून पदार्पण केले. त्यानंतर एका वर्षानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे संघात पदार्पण केले. २०१९मध्ये त्याला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघात निवडले होते.   

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघसनरायझर्स हैदराबाद