Join us  

Video : अजिंक्य रहाणेचा लेकीसोबत Cute Dance; चेन्नईत क्वारंटाईनचा पहिला दिवस!

India vs England मालिकेत BCCIनं खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांसोबत प्रवास करण्याची परवानगी दिली आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: January 27, 2021 5:02 PM

Open in App

भारत-इंग्लंड यांच्यातला पहिला कसोटी सामना ५ फेब्रुवारीला सुरू होणार आहे. त्यासाठी इंग्लंडचे सर्व खेळाडू आज चेन्नईत दाखल झाले, तर टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane), शार्दूल ठाकूर आणि रोहित शर्मा मंगळवारीच येथे दाखल झाले आहेत. अजिंक्य, शार्दूल आणि रोहित हे आता क्वारंटाईन कालावधीत आहेत. त्यांना सहा दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागणार आहे.

या मालिकेत BCCIनं खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांसोबत प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे अनेक खेळाडू आपापल्या पत्नी व मुलांसोबत या दौऱ्यावर असणार आहेत. बुधवारी अजिंक्यची पत्नी राधिका हिनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. क्वारंटाईनच्या पहिल्या दिवशी अजिंक्य मुलगी आर्यासोबत डान्स करताना दिसत आहे.   Virat Kohli in Legal Trouble: विराट कोहलीला झटका, केरळ उच्च न्यायालयानं पाठवली नोटिस 

पाहा व्हिडीओ... भारत आणि इंग्लंड यांच्यातला पहिला कसोटी सामना ५ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. दुसरा कसोटी सामनाही येथेच होईल. त्यानंतर तिसरा व चौथा कसोटी सामना २४ फेब्रुवारी व ४ मार्च या तारखेपासून अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर खेळवला जाईल. तिसरा कसोटी सामना हा दिवस-रात्र सामना असेल.  IND vs ENG : इंग्लंडचा संघ चेन्नईत दाखल; जाणून घ्या कसा आहे संपूर्ण दौरा, वेळ, ठिकाण अन् तारीख!

कसोटी मालिकेनंतर उभय संघांमध्ये पाच ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका होईल, हे सामने अनुक्रमे १२, १४, १६, १८ व २० मार्चला अहमदाबाद येथेच होती. त्यानंतर तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी दोन्ही संघ पुण्यात दाखल होतील. हे सामने २३, २६ व २८ मार्चला खेळवले जातील.  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडअजिंक्य रहाणे