England players arrive in Chennai for upcoming Test series against India; know full Schedule | IND vs ENG : इंग्लंडचा संघ चेन्नईत दाखल; जाणून घ्या कसा आहे संपूर्ण दौरा, वेळ, ठिकाण अन् तारीख!

IND vs ENG : इंग्लंडचा संघ चेन्नईत दाखल; जाणून घ्या कसा आहे संपूर्ण दौरा, वेळ, ठिकाण अन् तारीख!

ठळक मुद्देइंग्लंडच्या संघानं श्रीलंकेला त्यांच्याच घरच्या मैदानावर २-० असे पराभूत केलेभारतीय संघानंही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर २-१असा दणदणीत विजय मिळवला

श्रीलंकेला २-०असे दारूण पराभूत करून इंग्लंडचा संघ मंगळवारी चेन्नईत दाखल झाला. तामिळनाडू विमानतळावर सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली असून आता ते सहा दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये राहणार आहेत. जो रूटच्या नेतृत्वाखाली इंग्लंडनं श्रीलंका दौऱ्यावर निर्भेळ यश मिळवलं. जो रुटनं एक द्विशतक अन् दीड शतकी खेळी करताना दोन कसोटींत सर्वाधिक ४२६ धावा चोपल्या. इंग्लंडच्या डॉम बेस व जॅक लिच या फिरकीपटूंनी लंकन फलंदाजांना नाचवले. या दोघांनी अनुक्रमे १२ व १० विकेट्स घेतल्या. त्यात जेम्स अँडरसनही भन्नाट फॉर्मात आहे. ३८व्या वर्षी एका डावात ६ विकेट्स घेण्याचा पराक्रम त्यानं केला होता. त्यामुळे टीम इंडियाला हा संघ कडवी टक्कर देईल, अशी अपेक्षा आहे. ( England players arrive in Chennai ) 

भारतीय संघानंही ऑस्ट्रेलिया दौरा गाजवला. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितही टीम इंडियानं अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली २-१ असा विजय मिळवला. मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, शुबमन गिल, टी नटराजन ही मजबूत युवा फळी या दौऱ्यावर टीम इंडियाला गवसली. पण, या मालिकेत टी नटराजन टीम इंडियाचा सदस्य नसेल. भारतीय संघानं पहिल्या दोन कसोटीसाठी संघ जाहीर केला आहे. ५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा व शार्दूल ठाकूर हे मंगळवारीच चेन्नईत दाखल झाले आहेत, तर उर्वरित खेळाडू आज दाखल होतील. ( England players arrive in Chennai )  Great News : मोहम्मद सिराज, रिषभ पंत, टी नटराजन यांना मिळू शकतो ICCचा खास पुरस्कार! 

इंग्लंड मालिकेतील पहिल्या दोन कसोटींसाठीचा भारतीय संघ
( Indian squad for the first two Test matches against England) 
रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, रिषभ पंत, वृद्धिमान साहा, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, आर. अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर, 

नेट बॉलर : अंकित राजपूत, आवेश खान, संदीप वारियर, के. गौतम आणि सौरभ कुमार 

राखीव खेळाडू : के. एस. भरत (यष्टीरक्षक), शाहबाज नदीम, राहुल चाहर आणि अभिमन्यू ईश्वरन.   

पहिल्या दोन कसोटींसाठीचा इंग्लंडचा संघ
जो रूट, मोईन अली, जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, झॅक क्रॅवली, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लिच, डॉम सिब्ली, बेन स्टोक्स, ऑली स्टोन, ख्रिस वोक्स, जेम्स ब्रॅसी, मेसोन क्रॅन, साकिद महमूद, मॅट पर्किसन, ऑली रॉबीन्सन, अमर विर्दी.

भारतविरुद्ध इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक ( India vs England Full Time Table) 
 
कसोटी मालिका - 
पहिली ५ ते ९ फेब्रुवारी - चेन्नई, सकाळी ९.३० वाजल्यापासून 
दुसरी चेन्नई १३ ते १७ फेब्रुवारी- चेन्नई, सकाळी ९.३० वाजल्यापासून 
तिसरी २४ ते २८ फेब्रुवारी- अहमदाबाद, दुपारी २.३० वाजल्यापासून
चौथी ४ ते ८ मार्च -अहमदाबाद, सकाळी ९.३० वाजल्यापासून 

ट्वेंटी- 20  मालिका  (सर्व सामने अहमदाबाद)
 १) १२ मार्च पहिला टी-२०, सायंकाळी ७ वाजल्यापासून
२) १४ मार्च दुसरा टी-२०, सायंकाळी ७ वाजल्यापासून
३) १६ मार्च तिसरा टी-२०, सायंकाळी ७ वाजल्यापासून
४) १८ मार्च चौथा टी-२०, सायंकाळी ७ वाजल्यापासून
५) २० मार्च पाचवा टी-२०, सायंकाळी ७ वाजल्यापासून

वन-डे मालिका (सर्व सामने पुणे येथे)
१) २३ मार्च पहिला वन-डे, दुपारी १.३० वाजल्यापासून
२) २६ मार्च दुसरा वन-डे, दुपारी १.३० वाजल्यापासून
३) २८ मार्च तिसरा वन-डे, दुपारी १.३० वाजल्यापासून

थेट प्रक्षेपण - स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर, हॉटस्टार 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: England players arrive in Chennai for upcoming Test series against India; know full Schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.