Join us

Video : धोनी रिटायर हो... म्हणणाऱ्यांना बीसीसीआयची अशी चपराक

धोनीबद्दल रोहित शर्मा काय म्हणाला, तेसुद्धा जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 16:40 IST

Open in App

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : महेंद्रसिंग धोनीने निवृत्ती पत्करायला हवी, असं काही जणांचं म्हणणं आहे. दुसरीकडे आगामी विश्वचषकासाठी धोनीची भूमिका सर्वात महत्वाची ठरेल, असे म्हटले जात आहे.  पण धोनी रिटायर हो... म्हणणाऱ्यांना बीसीसीआयने जोरदार चपराक लगावली आहे. बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

बीसीसीआयचे पोस्ट केलेला हा व्हिडीओ एकदिवसीय सामन्यांच्या सरावाचानंतरचा आहे. सरावानंतर धोनीच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. त्यावेळी चाहत्यांनी धोनीकडून ऑटोग्राफ मागवल्या. धोनीनेही आपल्या चाहत्यांना निराश केले नाही. भारतीय संघ जवळपास दीड महिन्यांपासून ऑस्ट्रेलियामध्ये आहे. धोनीला  ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन काही दिवस झाले आहेत. पण तरीही धोनीची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही, हे या व्हिडीओमधून दिसत आहे.

धोनीबद्दल रोहित शर्मा काय म्हणाला, पाहा हा व्हिडीओ

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाबीसीसीआय