Join us

Video : धोनीला पाहताच गळ्यात पडला सुरेश रैना, मानेवर केलं Kiss

धोनीच्या स्वागताचा व्हिडीओ वायरल झालेला आपण पाहिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 09:45 IST

Open in App

मुंबई - आयपीएल सामन्यांसाठी टीम इंडियाचा माजी कर्णधारी आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने चेन्नईत पाऊल ठेवले. यावेळी, जून महिन्यात इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक सामन्यानंतर पहिल्यांदाच धोनी मैदानात उतरला. धोनीची पहिली झलक पाहण्याठी चाहते अतूर झाले होते. त्यामुळेच आपल्या लाडक्या माहीचे जोरदार स्वागत चाहत्यांनी केले. चेन्नई सुपर किंग्जमधील आपल्या सहकाऱ्यांना भेटून धोनीलाही अत्यानंद झाला.  

विश्वचषकानंतर पहिल्यांदाच मैदानात उतरलेल्या धोनीचे चाहत्यांनी केले जोरदार स्वागत, व्हिडीओ वायरल

धोनीच्या स्वागताचा व्हिडीओ वायरल झालेला आपण पाहिले. त्यानंतर, आता धोनी आणि सुरेश रैनाच्या जादू की झप्पीचा व्हिडीओही व्हायरल होत आहे. चेन्नई सुपर किंग्जने आपल्या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. आपल्या लाडक्या माहीला भेटून रैनालाही मोठा आनंद झाल्याचे या व्हिडीओत दिसते. कारण, अगोदर मिठी मारल्यानंतर सुरेश रैना धोनीच्या मानेवर किसही करतो. 

सुरेश रैनानेही टीम इंडियात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले होते. महेंद्रसिंह धोनच्या कॅप्टनसीमध्ये रैनाने भारतीय संघासाठी खेळ केला आहे. इंग्लंडविरुद्ध लीड्स येथे तब्बल दोनवर्षांपूर्वी रैना निळी जर्सी घालून मैदानात उतरला होता. तर, धोनीने गतवर्षी झालेल्या विश्वचषकातील उपांत्य सामन्यात एकाकी झुंज दिली होती. त्यामुळे, आयपीएलच्या निमित्ताने एकत्र भेटल्यानंतर दोन्ही मित्रांना, क्रिकेटर्संना मोठा आनंद झाला होता. चेन्नईतील धोनीचे फॅन्स त्याला थाला असे म्हणतात, तर सुरेश रैनाला 'चिना थाला' असं बोललं जातं. दरम्यान, धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने तीनवेळा चॅम्पियन ट्रॉफी पटाकवली आहे.  

टॅग्स :सुरेश रैनामहेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सआयपीएल