Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video : क्वारंटाईनमध्ये विराट-अनुष्का काय करतायत ते पाहा!

कोरोना व्हायरसमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात लॉकडाऊन जाहीर केला. तरीही लोकं घराबाहेर पडताना पाहून विराट चिडला आणि शुक्रवारी त्यानं एक व्हिडीओ अपलोड केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 11:28 IST

Open in App

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील सर्व क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे खेळाडूंना आपापल्या कुटुंबीयांसोबत पुरेसा वेळ घालवायला मिळत आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हेही लॉकडाऊनमुळे घरीच थांबले आहेत. अशात दोघंही एकमेकांना क्वालिटी टाईम देत आहेत. क्रिकेट विश्वातील हे क्यूट कपल क्वारंटाईनमध्ये काय करत आहेत, हे जाणून घ्यायची सर्वांना उत्सुकता नक्की लागली असेल. त्यांची ही उत्सुकता अनुष्कानं पोस्ट केलेला व्हिडीओ पाहून नक्की संपेल. 

कोरोना व्हायरसमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात लॉकडाऊन जाहीर केला. तरीही लोकं घराबाहेर पडताना पाहून विराट चिडला आणि शुक्रवारी त्यानं एक व्हिडीओ अपलोड केला. विरुष्कानं सर्वांना घरी राहण्याचं आवाहन आधीच केलं होतं. पण, विराटनं पोस्ट केलेल्या नव्या व्हिडीओत त्यानं नियम मोडणाऱ्यांचे कान टोचले आहेत.

तो म्हणाला,''एक भारतीय नागरिक म्हणून मी तुमच्याशी बोलत आहे. कर्फ्यूच पालनं न करणं, रस्त्यावर गर्दी करून फिरणारे लोग हे गेल्या काही दिवसांपासून मी पाहत आहे. आपण या युद्धाला खुप हलक्यात घेत आहोत, असं मला हे सर्व पाहून वाटलं. आपल्याला वाटते तेवढी ही लढाई सोपी नाही. त्यामुळे माझं सर्वांना आवाहन आहे की सोशल डिस्टन्सचा पालन करा. सरकारच्या नियमांचं पालन करा.''

शनिवारी अनुष्कानं एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात अनुष्का पती विराटची हेअरस्टायलिश बनली आहे. अनुष्का विराटचे केस कापताना पाहायला मिळत आहे.

पाहा व्हिडीओ... दरम्यान, काही दिवसांपूर्वी विराट आणि अनुष्का शर्मा यांनी मिळून एक व्हिडीओ पोस्ट केला होता.  ''आपण सर्व एका आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहोत. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखला जाऊ शकतो. त्यासाठी सर्वांनी घरी थांबण्याची गरज आहे. आम्ही दोघंही स्वतःच्या आणि इतरांच्याही सुरक्षिततेसाठी घरीच थांबत आहोत. एकांतवासात जाऊन सुरक्षित राहू....,'' असा संदेश या दोघांनी दिला आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Salute : आफ्रिदीनंतर बांगलादेशच्या कर्णधारानं घेतली 300 गरीब कुटुंबांची जबाबदारी

Video : कोरोना व्हायरसमुळे भयभीत आहात? DJ Bravoचं नवं प्रेरणादायी गाणं ऐका

 

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्माकोरोना वायरस बातम्या