Anaya Bangar Cricket News: टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू संजय बांगर याचा मुलगा आर्यन बांगर लिंगबदल शस्त्रक्रिया करून मुलगी झाली. तिने अनाया बांगर अशी नवी ओळख घेतली. या नावाने अनाया काही महिन्यांतच बरीच प्रसिद्ध झाली. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनल्यावर नुकतीच ती राईज अँड फॉल या रिअँलिटी शो मध्येही झळकली. त्यातून तिला OTT वरही बऱ्यापैकी ओळख मिळाली. तशातच आता तिने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तिने इन्स्टाग्रामवर एका व्हिडिओ संदेशात हा निर्णय शेअर केला आहे. व्हिडिओ संदेशात, अनाया बांगर तिच्या जुन्या दिवसांकडे परतण्याबद्दल बोलते आहे. जाणून घ्या नेमका प्रकार काय आहे...
अनाया बांगरचा मोठा निर्णय
व्हिडिओमध्ये अनाया बांगरने पहिल्यांदा राईज अँड फॉल या रिअँलिटी शोमध्ये तिला मिळालेल्या प्रेमाबद्दल चाहत्यांचे आभार मानले. त्यानंतर तिने सांगितले की ती तीन महिन्यांपूर्वी झालेल्या तिच्या शस्त्रक्रियेतून पूर्णपणे बरी झाली आहे. त्यामुळे आता ती तिच्या जुन्या दिवसांकडे परतण्याचा निर्णय घेत आहे. म्हणजेच आता ती पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये परतण्याबद्दल चर्चा करत आहे. अनाया बांगरने चाहत्यांना सांगितले की यावेळी ती आर्यन म्हणून नाही तर अनाया म्हणून क्रिकेटमध्ये परतणार आहे.
अनाया जेव्हा आर्यन होता, तेव्हा त्याने सरफराज खान आणि यशस्वी जैस्वाल सारख्या क्रिकेटपटूंसोबत क्रिकेट स्पर्धा खेळल्या. त्याला विराट कोहलीकडून क्रिकेट टिप्सदेखील मिळाल्या. पण आता अनाया म्हणून ती मैदानात उतरतेय. तिच्या लिंग परिवर्तनानंतर आता ती पूर्णपणे तंदुरूस्त झाली आहे. या शस्त्रक्रिया तिच्या परिवर्तनातील एक मोठे पाऊल होते, ज्यामुळे तिला अधिक आणि आनंदी वाटू लागले आहे.