मुंबई : भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मासाठी 2018 हे वर्ष चांगलेच फलदायी ठरत आहे. तो केवळ खोऱ्याने धावाच करत नाही, तर विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची धुराही सक्षमपणे सांभाळत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आशिया चषक उंचावला. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वन डे मालिकेत त्याला मागील दोन सामन्यांत अपयश आले असले तरी मुंबईत होणाऱ्या चौथ्या सामन्यात तो दमदार फलंदाजी करेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.
मात्र, सोशल मीडियावर तो वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. चौथ्या वन डे सामन्यापूर्वी रोहितने मुंबईच्या रस्त्यांवर गल्ली क्रिकेटमध्ये हात आजमावले आणि एका बाउन्सरवर सिक्सरही टोलवला. रोहितने हा व्हिडीओ त्याच्या फेसबूक अकाऊंट्सवर शेअर केला...
विंडीजविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात रोहितने नाबाद 152 धावांची खेळी केली होती. मात्र, पुढील दोन सामन्यांत त्याला ( 4 व 8) दुहेरी आकडा गाठता आला नाही.
View this post on Instagram