Join us  

त्या व्हिडिओत रडणाऱ्या मुलीच्या मामाने विराटसह अन्य टीकाकारांना दिले प्रत्युत्तर

काही दिवसांपूर्वी अभ्यास शिकवताना रडणाऱ्या मुलीचा व्हिडिओ बराच व्हायरल झाला होता. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसह अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करून अशाप्रकारे दमदाटी करून मुलांना  शिकवू नये, तर प्रेमाने शिकवावे असा सल्ला दिला होता. मात्र आता या व्हिडिओ प्रकरणात अजून एक ट्विस्ट आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 12:28 PM

Open in App
ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी अभ्यास शिकवताना रडणाऱ्या मुलीचा व्हीडिओ बराच व्हायरल झाला होता. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसह अनेकांनी हा व्हीडिओ शेअर करून अशाप्रकारे दमदाटी करून मुलांना  शिकवू नये, तर प्रेमाने शिकवावे असा सल्ला दिला होता. आता या व्हीडिओ प्रकरणात अजून एक ट्विट्स आला असून, त्या मुलीच्या मामाने समोर येत सर्व टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे.

नवी दिल्ली, दि. 23 -  काही दिवसांपूर्वी अभ्यास शिकवताना रडणाऱ्या मुलीचा व्हिडिओ बराच व्हायरल झाला होता. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसह अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करून अशाप्रकारे दमदाटी करून मुलांना  शिकवू नये, तर प्रेमाने शिकवावे असा सल्ला दिला होता. मात्र आता या व्हिडिओ प्रकरणात अजून एक ट्विस्ट आला असून, त्या मुलीच्या मामाने समोर येत सर्व टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे. या व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या मुलीचे बॉलिवुडशी कनेक्शन असून, ती गायक तोशी साबरीची भाची आहे. हया असे तिचे नाव असून, आपल्या बहिणीने ती  किती मस्तीखोऱ झाली आहे हे दाखवण्यासाठी तो व्हिडिओ व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केला होता, असे तोशीने म्हटले आहे.  हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर  हयाच्या पालकांवर बरीच टीका झाली होती. पालकांनी मुलांना प्रेमाने शिकवले पाहिजे. असेही सल्ले देण्यात येत होते. विराट कोहलीनेही असाच सल्ला दिला होता. मात्र तोशी साबरी या सर्वांचा प्रतिवाद करताना म्हणाला, "आमच्या मुलांविषयी विराट किंवा शिखर धवनला माहिती असू शकत नाही. हया खूप मस्तीखोर आहे. मात्र ती आमची सर्वांची लागडी आहे. पण तिचा हट्ट आणि लाडांमुळे तिला सूट दिली तर ती अभ्यास कसा काय करेल," 

दोन दिवसांपूर्वीच विराटने एका व्हिडिओ शेअर केला होता. त्यात एका  महिलेच्या अमानुष वागणुकीमुळे कळवळून रडताना दिसत होती.   हा  व्हिडीओ विराटने सोशल मीडियावर  शेअर करत म्हटले होते की, ''खरं तर आपण या मुलीच्या वेदनांकडे दुर्लक्ष करत आहोत. मुलांना शिकवताना आपण इतक्या अहंकारात बुडालो आहोत की आपल्याला त्या बाळाच्या वेदनादेखील दिसेनाशा झाल्या आहेत. अशा अमानुष प्रकारे एखाद्या मुलाला शिकवण्याची पद्धत पाहून मी दुःखी झालो आहे''.  एका लहान मुलाला कधीही धमकावून शिकवल्यास ते काहीही शिकत नाही, हे अत्यंत दुःखदायक आहे'', अशा शब्दांत विराटने या चिमुरडीच्या व्हायरल व्हिडीओबाबत दुःख व्यक्त केले  होते.  

टॅग्स :विराट कोहलीक्रिकेटभारत