Join us  

Video : सनरायझर्स हैदराबादच्या 'या' गोलंदाजाच्या नावावर 2020तील पहिली हॅटट्रिक

नववर्षातील पहिल्या शतकाचा मान ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन यांना पटकावला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 2:59 PM

Open in App

नववर्षातील पहिल्या शतकाचा मान ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन यांना पटकावला. त्यानंतर बुधवारी 2020मधील पहिल्या हॅटट्रिकची नोंद करण्यात आली. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लीगमध्ये ( BBL) ही हॅटट्रिक नोंदवली गेली. पण, हॅटट्रिक घेऊनही अ‍ॅडलेड स्ट्रायकर संघाला विजयापासून वंचित रहावे लागले. स्ट्रायकर आणि सिडनी सिक्सर्स यांच्यातला हा सामना रोमहर्षक झाला. सिक्सर्सने दोन विकेट राखून सामन्यात विजय मिळवला, परंतु स्ट्रायकरकडून हॅटट्रिक घेणाऱ्या गोलंदाजानं भाव खाल्ला...

अ‍ॅडलेड येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात स्ट्रायकर संघ 135 धावांत तंबूत परतला. प्रत्युत्तरात सिक्सर्स संघानं 2 विकेट व 8 चेंडू राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या स्ट्रायकरकडून जॅक विदराल्ड ( 47) आणि कर्णधार अ‍ॅलेक्स केरी ( 32) यांनी समाधानकारक खेळ केला. सिक्सर्सच्या टॉम कुरणने 3.4 षटकांत 22 धावांत 4 विकेट घेतल्या. बेन ड्वॅर्शूइस ( 2/20) आणि लॉयड पोप ( 2/33) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना सिक्सर्सची सुरुवात निराशाजनक झाली. जो व्हिंस ( 27) आणि टॉम कुरण ( 21) यांनी खिंड लढवली. स्ट्रायकर्सच्या रशीद खाननं या सामन्यात हॅटट्रिक नोंदवली. त्यानं 11व्या षटकाच्या अखरेच्या दोन चेंडूंवर अनुक्रमे व्हिंस आणि एडवर्ड यांना माघारी पाठवले. त्यानंतर 13व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्यानं जॉर्डन सिल्कला बाद करून हॅटट्रिक नोंदवली. 2020मधील ही पहिली हॅटट्रिक ठरली. 

पाहा व्हिडीओ...

रशीदच्या या हॅटट्रिकनंतर आणखी एका हॅटट्रिकची नोंद झाली. सिडनी थंडर्सच्या हॅरिस रॉफनं मेलबर्न स्टार्स संघाविरुद्ध ही हॅटट्रिक नोंदवली.

टॅग्स :सनरायझर्स हैदराबादटी-20 क्रिकेट