Video : पाकिस्तानच्या फलंदाजाची फजिती, धाव घेताना बूट निघाला अन्...

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत पाकिस्तान संघाने पहिल्या डावात 348 धावा केल्या. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात केन विलियन्सच्या शतकी खेळीच्या जोरावर दीडशे धावांहून अधिक आघाडी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 18:18 IST2018-12-06T18:18:42+5:302018-12-06T18:18:55+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Video: Pakistani player runout by funny way | Video : पाकिस्तानच्या फलंदाजाची फजिती, धाव घेताना बूट निघाला अन्...

Video : पाकिस्तानच्या फलंदाजाची फजिती, धाव घेताना बूट निघाला अन्...

अबुधाबी : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत पाकिस्तान संघाने पहिल्या डावात 348 धावा केल्या. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात केन विलियन्सच्या शतकी खेळीच्या जोरावर दीडशे धावांहून अधिक आघाडी घेतली आहे. पण, या सामन्यात एक हास्यास्पद प्रकार घडला आणि नेटिझन्सना पाकिस्तानच्या क्रिकेट संघाची खिल्ली उडवण्याची आयती संधीच मिळाली. या सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज यासिर शाह ज्याप्रकारे आऊट झाला ते पाहून हसू आवरणार नाही.
न्यूझीलंडचा पहिला डाव 274 धावांत गुंडाळून पाकिस्तानने प्रत्युत्तरात 348 धावा केल्या. आठव्या विकेटसाठी यासिर शाह आणि कर्णधार सर्फराज अहमद ही जोडी मैदानावर खेळत होती. मात्र, धाव घेण्याच्या नादात यासिरचा बुट निघाला आणि तो धावबाद झाला. यासिरच्या अशा बाद होण्याने अहमदचा पाराच चढला आणि तो डोक्याला हात लावून खालीच बसला.  


Web Title: Video: Pakistani player runout by funny way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.