Virat Kohli Moeen Ali Video, IPL 2022 CSK vs RCB: अफलातून स्पिन! मोईन अलीच्या फिरकीपुढे विराटची झाली दांडी गुल

विराटने फ्रंटफूटवर खेळण्यासाठी पाय पुढे काढला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 09:05 PM2022-05-04T21:05:10+5:302022-05-04T21:05:55+5:30

whatsapp join usJoin us
Video of Moeen Ali clean Bowled Virat Kohli with well guided off spin bowling IPL 2022 CSK vs RCB Live | Virat Kohli Moeen Ali Video, IPL 2022 CSK vs RCB: अफलातून स्पिन! मोईन अलीच्या फिरकीपुढे विराटची झाली दांडी गुल

Virat Kohli Moeen Ali Video, IPL 2022 CSK vs RCB: अफलातून स्पिन! मोईन अलीच्या फिरकीपुढे विराटची झाली दांडी गुल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Virat Kohli Moeen Ali Video, IPL 2022 CSK vs RCB: चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून आपला २००वा सामना खेळणारा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर विराट कोहली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार फाफ डु प्लेसिस दोघे फलंदाजीसाठी आला. डु प्लेसिस स्वस्तात बाद झाला. पाठोपाठ ग्लेन मॅक्सवेलही झटपट धावचीत झाला. विराटला चांगली सुरूवात मिळाली होती, पण मोईन अलीने अप्रतिम फिरकीच्या जाळ्यात ओढत विराटचा त्रिफळा उडवला.

विराट कोहलीने अतिशय संयमी खेळी करण्यास सुरूवात केली. पहिल्याच षटकात त्याच्या बॅटला कट लागून चेंडू सीमारेषेपार गेला. त्यामुळे तो सावधगिरीने खेळत होता. वेगवान गोलंदाजांना मोक्याच्या क्षणी फटके मारत त्याने आपली धावसंख्या दोन आकडी केली. पण मोईन अलीची गोलंदाजी मात्र त्याने अतिशय संयमीपणे खेळली. विराट बाद होण्याआधीच्या दोन चेंडूवर त्याला नीट खेळता आले नाही. त्याचा फटका पुढच्याच चेंडूवर त्याला बसला. मोईन अलीने अतिशय संथगतीने टाकलेला चेंडू खेळण्यासाठी विराटने पाय पुढे काढला आणि तो क्लीन बोल्ड झाला.

मोईन अलीच्या फिरकीपुढे विराट कोहलीची झाली दांडी गुल, पाहा Video-

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (किपर), महिपाल लोमरोर, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेजलवूड

चेन्नई सुपर किंग्ज: ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, एमएस धोनी (कर्णधार व किपर), रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, सिमरजीत सिंग, मुकेश चौधरी, महेश तिक्षणा

Web Title: Video of Moeen Ali clean Bowled Virat Kohli with well guided off spin bowling IPL 2022 CSK vs RCB Live

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.