Join us  

Video : फलंदाजानं टोलावलेला चेंडूं प्रेक्षकांमधील चिमुरडीला लागला अन् त्यानंतर जे घडले त्याची होतेय चर्चा

डिव्हाईनचे ट्वेंटी-20 क्रिकेटमधील हे सहावे शतक ठरले आणि तिनं सुझी बेट्स व अॅलिसा हिली यांचा सर्वाधिक ट्वेंटी-20 शतक झळकावण्याचा विक्रम मोडला. या दोघींच्या नावावर प्रत्येकी पाच शतकं आहेत.

By स्वदेश घाणेकर | Published: January 17, 2021 2:40 PM

Open in App

न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिव्हाईन ( Sophie Devine) हीनं वेलिंग्टन ब्लेझ संघाकडून महिला ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये जलद शतकाची नोंद केली. तिनं स्थानिक सुपर स्मॅश स्पर्धेत ओटॅगो संघाविरुद्ध ३६ चेंडूंत शतक पूर्ण केलं. ९४ धावांवर असताना डिव्हाईननं उत्तुंग षटकार खेचला आणि या विक्रमाला गवसणी घातली. ती या शतकाचं सेलिब्रेशन करणार तोच प्रेक्षकांमध्ये बसलेल्या चिमुकलीला पाहून डिव्हाईन भावूक झाली. तिनं टोलावलेला चेंडू त्या चिमुकलीला लागला होता आणि ती ढसाढसा रडू लागली.  

त्या मुलीला कुशीत घेऊन आई सावरण्याचा प्रयत्न करत होती. हे डिव्हाईनला दिसताच शतकाचं सेलिब्रेशन न करता ती त्वरीत त्या चिमुरडीकडे गेली. त्या मुलीची विचारपूस तिनं केली. इतकच नाही तर तिनं काही वेळ त्या मुलीसोबतही घालवला. डिव्हाईनच्या या कृतीची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा आहे. 

पाहा व्हिडीओ...  पुरुष व महिला क्रिकेटपटूंमध्ये डिव्हाईननं सर्वात जलद शतक झळकावले. तिच्या या फटकेबाजीच्या जोरावर वेलिंग्टन संघानं ८.४ षटकांत १२९ धावा करून दहा विकेट्स राखून विजय मिळवला. 

डिव्हाईनचे ट्वेंटी-20 क्रिकेटमधील  हे सहावे शतक ठरले आणि तिनं सुझी बेट्स व अॅलिसा हिली यांचा सर्वाधिक ट्वेंटी-20 शतक झळकावण्याचा विक्रम मोडला. या दोघींच्या नावावर प्रत्येकी पाच शतकं आहेत.   

टॅग्स :न्यूझीलंडटी-20 क्रिकेटमहिला टी-२० क्रिकेट