Join us  

मोठी बातमी: न्यूझीलंडला 'कसोटी' वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूची अचानक निवृत्ती, ढसाढसा रडला 

२०२१ मध्ये भारताविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) फायनलमध्ये त्याने कमाल केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 10:17 AM

Open in App

Neil Wagner retire ( Marathi News ) - न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वॅगनरने वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह येथे पत्रकार परिषदेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. वॅगनरने न्यूझीलंडसाठी ६४ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात २०२१ मध्ये भारताविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) फायनलचा समावेश आहे. या गोलंदाजाने आपल्या कारकिर्दीत २६० विकेट्स घेतल्या आहेत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान तो शेवटचा आठवडा संघासोबत घालवणार आहे.

२९ फेब्रुवारीपासून वेलिंग्टन येथे सुरू पहिल्या कसोटीसाठी वॅगनर प्लेइंग इलेव्हनचा भाग असणार नाही आणि क्राइस्टचर्चमधील दुसऱ्या सामन्यापूर्वी त्याला संघातून वगळण्यात येईल. ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, वॅगनरला सांगण्यात आले होते की तो या मालिकेसाठी न्यूझीलंडच्या प्लेइंग ११ चा भाग असणार नाही. अशा परिस्थितीत त्याने मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड यांच्यासोबत पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला.

  "हा एक भावनिक आठवडा आहे," असे वॅगनर पत्रकार परिषदेत म्हणाला. "ज्या खेळाला तुम्ही खूप काही दिले आहे आणि त्यातून खूप काही मिळवले आहे, त्यापासून दूर जाणे सोपे नाही, परंतु आता इतरांनी या संघाला पुढे नेण्याची वेळ आली आहे. मी कसोटी क्रिकेट खेळण्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला आहे. मला न्यूझीलंडचा अभिमान आहे आणि आम्ही एक संघ म्हणून जे काही साध्य केले आहे, त्याचा आंद आहे," असे तो म्हणाला. 

दरम्यान, मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड म्हणाले की, ''न्यूझीलंडसाठी वॅगनरने जे काही केलं ते विसरता येणआर नाही. त्याने वाईट परिस्थितीत विकेट घेण्याचा मार्ग शोधून काढला. 

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धान्यूझीलंड