Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video : महेंद्रसिंग धोनीचं टेनिस कोर्टवर पदार्पण, येथेही विरोधी टीमने मानली हार 

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं वेस्ट इंडिज दौऱ्यातून आणि मायदेशात झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती घेतली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 14:50 IST

Open in App

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं वेस्ट इंडिज दौऱ्यातून आणि मायदेशात झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती घेतली होती. नोव्हेंबर महिन्यापर्यंत तो विश्रांतीवर आहे. क्रिकेटच्या मैदानापासून दूर असलेला धोनी टेनिस कोर्टवर उतरला आणि त्यानं तेथे विजयी पदार्पण केले. झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनच्या कंट्री क्रिकेट क्लब टेनिस स्पर्धेत धोनी खेळला. पुरुष दुहेरीच्या सामन्यात धोनीनं स्थानिक टेनिसपटू सुमित कुमारशी जोडी केली. या जोडीनं पहिल्याच सामन्यात विजय मिळवला. धोनी व सुमित या जोडीनं मायकेल व चॅल्से या जोडीवर 6-0, 6-0 असा दणदणीत विजय मिळवला. 38वर्षीय धोनीचा सामना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली होती.   

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीटेनिस