Join us

...म्हणून महेंद्रसिंग धोनी ग्रेट आहे, पाहा व्हिडीओ 

महेंद्रसिंग धोनीचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ट्वेंटी-20 मालिकेत समावेश नसला तरी त्याच्याभवती चाहत्यांचा आजही गराडा पाहायला मिळतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 09:43 IST

Open in App

मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ट्वेंटी-20 मालिकेत समावेश नसला तरी त्याच्याभवती चाहत्यांचा आजही गराडा पाहायला मिळतो. सर्व वयोगटात त्याचे फॅन्स आहेत. त्याने एका लहानग्या चाहत्याप्रती दाखवलेले प्रेम पाहून सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

 सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत धोनी गाडीत बसला आहे आणि चिमुरड्या चाहत्यासाठी तो गाडीचा दरवाजा उघडून मनसोक्त गप्पा मारताना दिसत आहे.  धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने ट्वेंटी-20 विश्वचषक, वन डे विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केला आहे. तसेच त्याच्या कौशल्यामुळे भारताने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानही पटकावले होते. मात्र, आता निवड समितीने ट्वेंटी-20 संघापासून दूर ठेवले आहे.  

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीबीसीसीआय